रोटरी क्लब अहमदपूरचा पदग्रहण सोहळा संपन्न
समाजाची गरज ओळखून कार्य करणारी एकमेव जागतिक संघटना म्हणजे रोटरी क्लब- सुधीर लातूरे
अहमदपूर( गोविंद काळे) येथील सामाजिक कार्यात स्वखर्चातून कार्य करणाऱ्या रोटरी क्लब ऑफ अहमदपूर चा 2023 -24 चा पदग्रहण समारंभ संस्कृती फंक्शन हॉल येथे नियोजित प्रांतपाल (2025-26) सुधीर लातूरे व सहप्रांतपाल विशाल जैन यांचे उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी मावळते अध्यक्ष रो.जीवन कापसे यांनी नूतन अध्यक्ष रो. शिवशंकर पाटील यांना तर मावळते सचिव रो कपिल बिरादार यांनी नूतन सचिव रो श्रीराम कलमे यांना कॉलर प्रदान करून पदभार दिला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस मावळते सचिव रो. कपिल बिरादार यांनी मागील वर्षीच्या कार्याचा आढावा मांडला तर नूतन अध्यक्ष रो. शिवशंकर पाटील यांनी पुढील वर्षभरात राबवण्यात येणाऱ्या प्रोजेक्ट बद्दल माहिती दिली व नूतन संचालक मंडळाची घोषणा केली.
यावर्षीचा रोटरी चा विशेष पुरस्कार राज्यस्तरीय शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त प्रा. दत्ताभाऊ गलाले यांना देण्यात आला.
यावेळी प्रमुख अतिथी सुधीर लातूरे बोलताना म्हणाले अहमदपूर रोटरी ही गेली 35 वर्षापासून समाजाची गरज ओळखून स्वखर्चातून त्यांना मदत करण्याचे काम अविरत करत आहे. पुढे बोलताना लातूरे म्हणाले रोटरी ही जागतिक स्तरावर सेवाभावाने काम करणारी एकमेव संघटना आहे. आपल्या डिस्ट्रिक्ट 3132 मध्ये अनेक ग्लोबल ग्रँड प्रोजेक्ट निर्माण झाले आहेत. प्रत्येक रोटरी मेंबर हा स्वतःच्या उत्पन्नातील काही हिस्सा केवळ समाजकार्यासाठी व रोटरीच्या माध्यमातून नवीन मित्र जोडण्यासाठी खर्च करत असतो. रोटरी क्लब साठी कुठलाही शासकीय फंड नसून संपूर्ण जगभरात रोटरी सभासदांच्या सहकार्यातुनच मोठी काम होत असते. त्याचाच एक भाग अहमदपूर रोटरी आहे. अहमदपूर मध्ये पुढील काळात एखादा कायमस्वरूपी रोटरीचा प्रकल्प व्हावा असे ही ते म्हणाले.
यावेळी सहप्रांतपाल विशाल जैन यांनी प्रांतपाल रो स्वाती हेरकल यांचा शुभ संदेश व पुढील वर्षभरात परिवर्तन प्रोजेक्टच्या माध्यमातून करावयाच्या उपक्रमाविषयी माहिती दिली.
यावेळी नूतन सदस्य म्हणून डॉ ऋषिकेश पाटील, डॉ अतुल खडके, आशिष आंधळे, डॉ नेहा पाटील, डॉ अंजली उगिले,संगीता खंडागळे, वृषाली चवळे, अरुणा बिरादार, रिया घाटोळ, अश्विनी कलमे, वर्षाराणी पाटील, यांना रोटरीची पिन देऊन सभासद करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रो.प्रा.अनिल चवळे यांनी तर आभार रो. सचिन करकनाळे यांनी मानले कार्यक्रमाची सुरुवात वृक्षास पाणी घालून तर राष्ट्रगीताने सांगता करण्यात आली.
यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार व मुलींच्या जन्माचे स्वागत करण्यासाठीची प्रतिज्ञा तसेच फक्त मुली असणाऱ्या रोटेरियनचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमासाठी डॉ. अशोक सांगवीकर, डॉ पांडुरंग कदम, डॉ चंद्रकांत उगिले, डॉ नंदकुमार गुणाले, डॉ सतीश पेड, डॉ निलेश मजगे, डॉ संगमेश्वर हेंगणे, ऍड भारत चामे, नरसिंग चिलकावार, महेंद्र खंडागळे, मोहिब कादरी, प्रा व.मा. माने, शिवाजी पाटील, नजीब पठाण, राजेंद्र कल्याणे, भरत ईगए, धनंजय कोत्तावार, गंगाधर याचवाड ,शरद जोशी, गोपाळ पटेल, प्रशांत घाटोळ, अनिल फुलारी, संतोष मद्देवाड, रवी पुणे, पांडुरंग पाटील, राहुल घाटोळ ,संजय गोटमवाड ,ज्ञानोबा भोसले, बालाजी पटवारी, दिलीप आरदवाड ,धोंडीराम ईरलापल्ले, मनोज आरदवाड, राजकुमार बिरादार, राजेश्वर पाटील तादलापूर, अशोक पाटील, राजेश्वर पाटील तोगरी, विलास ढगे, प्रभाकर सूर्यवंशी, शिवमुर्ती भातांबरे ,भरत शिरूरकर यांचे सह रोटरी सभासद व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व रोटरी क्लब अहमदपूरच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.