मणिपूर महिला अत्याचार निषेधार्थ राष्ट्रवादी चा मौन सत्याग्रह
लातूर (प्रतिनिधी) : मणिपूर राज्यात मागील 3 महिन्यापासून हिंसाचार, दंगल, जाळपोळ, महिला अत्याचार, सैनिकावर हल्ले सुरू आहेत. या मानवतेला काळिमा फासणाऱ्या आणि देशविघातक घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लातूर शहर जिल्हा च्या वतीने महात्मा गांधी चौक,लातूर येथे मौन सत्याग्रह करून काळ्या पट्ट्या बांधून निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लातूर शहर जिल्हाध्यक्ष राजा मणियार, प्रदेश सरचिटणीस आशाताई भिसे, प्रदेश सचीव संजय शेटे, प्रशांत घार, बक्तावर बागवान, माजी नगरसेविका छायाताई चिंदे, माजी नगरसेविका इरशाद मौलाना तांबोळी, महिला शहरजिल्हाध्यक्षा रेखाताई कदम, रेणापूर शहराध्यक्ष बालाजी कदम, समीर शेख, डी.उमाकांत, शहर कार्याध्यक्षा मनिषा कोकणे, कालिंदा सुर्यवंशी, सविता पवार, सुनिता सोनकांबळे, अश्विनी अडसुळे, संगिता मगर, ऍड.शेखर हविले, इराण्णा पावले, ऍड.प्रदिप पाटील, पप्पू कासले, मुन्ना तळेकर, चंद्रशेखर कत्ते, विशाल देवकते, बरकत शेख, बस्वेश्वर रेकुळगे, शकिल शेख, फेरोज सय्यद, फेरोज पठाण, उस्मान शेख, इरफान शेख, इब्राहिम शेख, अब्दुल शेख, शाहरुख पठाण, तोसिफ शेख, जाकीर सय्यद, जाकीर तांबोळी, शहादत पठाण, अनिल विरेकर, आबा सुर्यवंशी, किरण माचिले, सचिन मेटे, राजकुमार जोशी, जितेंद्र तोडकर, विकास लांडगे, प्रवीण साळुंके, गोविंद लोहार, इम्रान सय्यद, मोहसिन, आदर्श उपाध्ये, शाम कसबे, शिवराज शिंदे, सचिन मुकदम यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व युवती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.