लाल बहादूर शास्त्री प्राथमिक शाळेत शिक्षण विवेक अंकाचे विमोचन संपन्न

लाल बहादूर शास्त्री प्राथमिक शाळेत शिक्षण विवेक अंकाचे विमोचन संपन्न

उदगीर (एल.पी.उगीले) : भारतीय शिक्षण प्रसारक संस्था,अंबाजोगाई संचलित लाल बहादूर शास्त्री प्राथमिक विद्यालयात “शिक्षण विवेक” अंकाचे विमोचन करण्यात आले.त्या नंतर वृक्षारोपण व जण जागरूकता कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून शालेय समिती अध्यक्ष व्यंकटराव गुरमे, संस्कार केंद्रप्रमुख अंकुश निरगुडे, विभाग प्रमुख सुधाकर पोलावार व सुरेखाबाई कुलकर्णी उपस्थित होते.
शालेय समिती अध्यक्ष व्यंकटराव गुरमे यांच्या हस्ते शिक्षण विवेक अंकाचे विमोचन करण्यात आले,तसेच शालेय परिसरामध्ये विस्तार सेवा विभागामार्फत वृक्षारोपण करण्यात आले,नगर परिषदेच्या वतीने वृक्षारोपणासाठी देण्यात आलेल्या बिया व पिशव्यांचे वाटप शालेय विद्यार्थ्यांना करण्यात आले. शालेय समिती अध्यक्ष व्यंकटराव गुरवे यांनी’ एक मूल एक झाड’ या संकल्पनेतून प्रत्येकाने एक झाड लावून त्याचे संगोपन करावे.असे आवाहन केले.संत तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’.असे समजून सर्वांनी निसर्गाचा समतोल राखण्यासाठी जास्तीत जास्त वृक्षारोपण करून ,त्याचे संरक्षण करावे. असे मार्गदर्शन निसर्ग जागरूकता म्हणून करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अभ्यास पूरक मंडळ प्रमुख माधव केंद्रे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.

About The Author