तात्काळ पीकविमा वाटप करावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे निवेदन
उदगीर (प्रतिनिधी ) : उदगीर तालुक्यात पेरणी झाल्यावर सलग 25 दिवस पाऊस न पडल्यामुळे खरीप पिकाचे मोठ्या प्रमानात नुकसान झाले आहे.सलग 21 दिवस पाऊस न पडल्यास नियमाप्रमाणे विमा कंपनीला शेतकऱ्यांना पीकविमा द्यावा लागतो.
यासाठी जिल्हा कृषी अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्यामार्फत विमा कंपनीला कळवून तात्काळ विमा मिळवून द्यावा. अशी मागणी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केली आहे. या निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा.डॉ.शिवाजीराव मुळे, अजीम दायमी,शहर कार्याध्यक्ष गजानन सताळकर, रामभाऊ हडोळे,व्यंकटराव पाटील,कैलास पाटील,शिवाजी केंद्रे,माधव उदगीरकर,शंकर मुक्कावार, साजिद कुरेशी,धनराज बनसोडे,इरफान पटेल,मोहमदरफी पटेल,प्रेम तोगरे आदींसह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.