माऊली नगर मध्ये नागपंचमी निमित्त महिलांच्या हस्ते वृक्षारोपण
उदगीर (प्रतिनिधी) : माऊली नगर मधील दक्षिणमुखी हनुमान मंदिर व महादेव मंदिरात नागपंचमी निमित्त महिलांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी काॅलनीतील सर्वच महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. माऊली नगर मध्ये नागपंचमी निमित्त एक अणोखा उपक्रम राबविण्यात आला. महिलांनी पुढाकार घेऊन मंदिर परिसरात वृक्षारोपण केले. वृक्षाचे महत्त्व आपण सर्वजण जाणतो. परिसराचे नंदनवन करावयाचे असेल तर वृक्षारोपण करावे. वृक्षामुळे आपल्याला शुद्ध हवा, फळे,सावली, लाकुड मिळते. वृक्षाचे संवर्धन व संगोपन करणे , हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. आज आपण ज्या झाडाची फळे खातो ती झाडे आपल्या पुर्वजांनी लावले आहेत, त्यामुळे पुढील पिढी साठी फळे उपलब्ध करुन देणे, हे आपले कर्तव्य आहे. त्यासाठी वृक्षारोपण करणे हे आवश्यक आहे. माऊली नगर मध्ये वृक्षारोपण करण्यासाठी ग्रामसेवक संतोष माचेवाड यांनी वृक्ष उपलब्ध करुन दिले, त्याबद्दल त्याचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी मुस्कावाड यांनी केले तर आभार काॅलनीचे अध्यक्ष संतोष चामले यांनी मानले. यावेळी वृक्षारोपण कार्यक्रमासाठी नगरातील सर्वच नागरिकांनी परिश्रम घेतले.