पुढच्या पिढीवर चांगले संस्कार व्हावेत म्हणून रेणुकाचार्य संस्कार भवनची निर्मिती – ना. संजय बनसोडे

पुढच्या पिढीवर चांगले संस्कार व्हावेत म्हणून रेणुकाचार्य संस्कार भवनची निर्मिती - ना. संजय बनसोडे

उदगीर (एल.पी.उगीले) : ‘सबका साथ, सबका विकास ‘ म्हणून आपण सर्व जाती धर्माचा सर्वांगीण विकास करत असताना शहरातील सर्व समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्रात उदगीर मतदार संघाची एक वेगळी ओळख निर्माण करुन सांस्कृतिक शहर म्हणून नावारूपाला आणले आहे. मतदार संघात विविध इमारती बांधल्या असुन त्या लवकरच नागरिकांच्या सेवेत येतील त्यामुळे आता आपण पुढच्या पिढीवर चांगले संस्कार व्हावे म्हणून श्री रेणुकाचार्य संस्कार भवनची निर्मिती करत असुन महाराष्ट्रातील पहिले भवन आपल्या शहरात उभारत असल्याचे मत क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केले. ते श्री गुरु हावगीस्वामी महाराज मठ धर्मशाळा (भक्त निवास) बांधकाम व श्री रेणुकाचार्य संस्कार भवन बांधकाम भूमिपूजन समारंभाप्रसंगी बोलत होते.
यावेळी श्री गुरु हावगीस्वामी महाराज मठ धर्मशाळा (भक्त निवास) बांधकाम व श्री रेणुकाचार्य संस्कार भवनाच्या बांधकामाचे भुमीपुजन ना.संजय बनसोडे यांच्या हस्ते श्रीफळ फोडुन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डाॅ.शंभुलिंग शिवाचार्य महाराज हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन माजी आ.गोविंदराव केंद्रे, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, बाजार समितीचे माजी सभापती सिद्धेश्वर पाटील, माजी नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे, उध्दव महाराज हैबतपुरे,भाजपाचे प्रवक्ते शिवानंद हैबतपुरे, शिवराज नावंदे गुरुजी, भाजपाचे शहराध्यक्ष मनोज पुदाले, शहराध्यक्ष समीर शेख, शहराध्यक्ष मंजुरखाँ पठाण, उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार रामेश्वर गोरे, मुख्याधिकारी शुभम क्यातमवार, सुखदेव स्वामी, प्रदेश सचिव इम्तियाज शेख, माजी नगरसेवक गणेश गायकवाड, पाशा मिर्झा बेग, लक्ष्मण सोनवळे, रेखा कानमंदे, अॅड.दत्ता पाटील, तात्या पाटील, महावितरणचे उप अभियंता सायस दराडे, बांधकाम विभागाचे एल.डी. देवकर, बाबुराव समगे, विजयकुमार स्वामी, सुभाष धनुरे, उदय मुंडकर, उदयसिंह ठाकुर, विजयकुमार स्वामी , सतिश पाटील माणकीकर, विजयकुमार चवळे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना ना.संजय बनसोडे यांनी, माझी भुमिका ही सर्व जाती धर्मला सोबत घेवुन चालण्याची आहे ती कायम ठेवणार आहे.
आपण एकत्र आहोत हा संदेश संबंध महाराष्ट्रात गेला आहे. आपल्या मतदार संघाच्या विकासाचा बॅकलाॅग मागील ५० वर्षाचा होता तो आपण भरुन काढला आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच जंगम समाजासाठी श्री रेणुकाचार्य संस्कार भवनची निर्मिती होत आहे. या मठात सर्व जाती – धर्माला घेवुन चालणारे नागरीक असुन या ठिकाणाहुन चांगले संस्कार आपण घेवुन बाहेर पडतो. त्यामुळे या ठिकाणी सर्वांच्या भावना आहेत. या मठाच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटीबध्द आहे. मी या पूर्वीही वैयक्तीक मदत केली आहे पुढे ही करणार असुन आपण कोणीही काही चिंता करु नका असे आश्वासन देवुन होणारे काम हे दर्जेदार व वेळेत करण्याच्या सुचना ना.बनसोडे यांनी दिल्या. भविष्यात श्री रेणुकाचार्य संस्कार भवनासाठी निधी कमी पडू देणार नाही. निधी कमी पडला तर तो वाढीव म्हणून पुन्हा उपलब्ध करुन देणार असल्याची ग्वाही ही ना.बनसोडे यांनी दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन नंदकुमार पटणे यांनी केले. यावेळी नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author