विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनचा जिल्हास्तरीय मेळावा आणि रक्तदान शिबिर संपन्न

विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनचा जिल्हास्तरीय मेळावा आणि रक्तदान शिबिर संपन्न

उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर येथे संघटनेच्या 46 व्या वर्धापनाचे निमित्त साधून संघटनेच्या वतीने भव्य असा जिल्हास्तरीय कामगार मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यासाठी संघटनेचे केंद्रीय सरचिटणीस रवींद्र देवकांत हे उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून संघटनेचे राज्य सचिव हरेराम जी गीते हे उपस्थित होते, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संजय गडेकर उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी गाये, गंगाधर भाडूळे, अनंत बिराजदार, वसंतराव माने, ढाकणे तसेच संस्थेचे पदाधिकारी, जिल्हास्तरीय पदाधिकारी व उदगीर, निलंगा विभागातील पदाधिकारी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कामगार मेळाव्यात 45 तांत्रिक विभागातील कर्मचारी बांधवांनी संघटनेमध्ये जाहीर प्रवेश केला. संघटनेच्या वतीने मेळाव्यासोबतच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 35 रक्तदात्यांनी रक्तदान केले. याप्रसंगी मुख्य मार्गदर्शक रवींद्र देवकांत यांनी कर्मचाऱ्यांना संघटन बांधणीचे महत्त्व आणि एकसंघ राहिल्यानंतर कर्मचाऱ्यांना होणारा फायदा, कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी एकसंघ प्रयत्न केल्याने प्रश्न सुटतात, लवकर न्याय मिळू शकतो. तसेच वैयक्तिक पातळीवरील अडीअडचणी सोडवण्यासाठी ही संघटना मदत करते, असे सांगितले. संघटन बांधणीतील व्यवस्थापन आणि संभाव्य पगारवाढीच्या संदर्भातील सविस्तर मार्गदर्शन केले. रक्तदान केलेल्या रक्तदात्यांचा सन्मानही याप्रसंगी करण्यात आला.

About The Author