लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीकविमा अग्रिम मंजूर करा – सचिन दाने

लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीकविमा अग्रिम मंजूर करा - सचिन दाने

प्रतिनिधी (लातूर) : लातूर जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून सर्व महसूल मंडळात पावसाचा खंड पडला आहे,त्यामुळे शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे वाढ झाली नाही.या विषयी शिवसेना मा उपजिल्हाप्रमुख, शेतकरी नेते सचिन दाने यांनी प्रधानमंत्री पिकविमा योजना (PMFBY)खरीप हंगाम २०२३ शासन निर्णय क्र. प्रपीवियो-२०२३/प्र. क्र.५२/११-A अंतर्गत लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पावसातील खंड याबाबी खाली पिकांचे नुकसान झाल्यामुळे (mid season adversity) सरसकट विमा लागू करण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हा अधिकारी कृषी अधीक्षक यांना केली.

निवेदनात पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या खरीप पिकांची वाढ झाली नाही, या कारणामुळे शेतकऱ्यांस टाळता न योण्या जोगे कारणामुळे झालेल्या नुकसानीस विमा संरक्षण मिळावे, पिक पेरणी पासून आत्तापर्यंत हंगामात पाऊस नसल्यामुळे प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे कोरडा दुष्काळ सदृश परिस्थिती खास करून रेणापूर तालुका, लातूर तालुका, औसा तालुका या भागातील सर्व महसूल मंडळात उद्धभवली आहे तरी यामुळे सरासरी उत्पादनाच्या ५०% पेक्षा जास्त घट अपेक्षित आहे.तरी झालेले नुकसान शेतकऱ्यांना परवडणारे नसून (On account payment of claims due to mid – season adversity) अंतर्गत लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कसल्याही जाचक अटी न लावता सरकट सर्व शेतकऱ्यांचे नुकसान ग्राह्य धरून देय असलेली विमा संरक्षित रक्कम अदा करावी.

लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मागणी मान्य करून न्याय द्यावा अन्यथा लातूर जिल्ह्यातील शेतकरी, शिवसेना, शेतकरी क्रांती आंदोलन, आपल्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करेल,उद्धभवणाऱ्या कायदा व सुव्यवस्था प्रश्न आणि परिस्थिस सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील असा इशारा शेतकरी नेते सचिन दाने यांनी दिला आहे.

About The Author