प्रभुराज प्रतिष्ठान लातूरच्या वतीने चांद्रयान ३ च्या यशस्वी मोहिमेबद्दल आनंदउत्सव

प्रभुराज प्रतिष्ठान लातूरच्या वतीने चांद्रयान ३ च्या यशस्वी मोहिमेबद्दल आनंदउत्सव

लातूर (प्रतिनिधी) : नाना नानी उद्यान परिसरात प्रभुराज प्रतिष्ठान लातूर च्या वतीने चांद्रयान ३ च्या यशस्वी मोहिमेबद्दल वैज्ञानिकांचे अभिनंदन करण्यात आले आणि पेढे वाटून जल्लोष साजरा करतात आला.या यशाचा आनंद पूर्ण भारतातील जनतेला आहे या चंद्रयान ३ मोहीम यशस्वी झाल्याबाबत भारतातील नव्हे तर पूर्णजगातील जनतेला अभिमानाची बाब आणि आज वैज्ञानिकांनी भारताचे नाव लौकिक केले आहे. या यशाबद्दल संपूर्ण भारत देश आनंद साजरी करत आहे.चंद्रयान ३ यशाबाबत लातूरातही प्रभुराज प्रतिष्ठान च्या वतीने पेढे वाटप करून आनंद उत्सव साजरा करण्यात आला.यावेळी प्रभुराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष अँड.अजय कलशेट्टी, लहान खेळाडू शौर्य दांडगे, रमेश भुतडा, बाळाप्रसाद बिदादा,एम.एम.पाटील, अशोक पंचाक्षरी, दत्ता गायकवाड, विलास भुमकर, मोतीराम कदम, शिवा रोडे, डाँ.संजय जमादाडे, शिरीष माळी,नंदकुमार बनाळे, संजय बागडे, डॉ. श्रीराम कोळेकर,पारस चापlशी,सोमनाथ खुदाशे,विजय वारद,सुरेश कोटलवार,आत्माराम कदम,काशिनाथ हुंडेकरी, पाटील, रमण लाहोटी, यांची प्रमुख उपस्थिती होती.

About The Author