मराठवाडा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांचा व परिवाराचा सन्मान करा.उपजिल्हाधिकारी प्रवीण फुलारी यांचे प्रतिपादन

मराठवाडा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांचा व परिवाराचा सन्मान करा.उपजिल्हाधिकारी प्रवीण फुलारी यांचे प्रतिपादन
 अहमदपूर ( गोविंद काळे) मुस्लिमांच्या झोपड्यातून मराठवाड्याच्या भूमीची सुटका स्वातंत्र्य सैनिकाच्या अथक परिश्रमातून  व रक्तातून मराठवाड्याची भूमी मुक्त झालेली आहे. म्हणूनच स्वातंत्र्य सैनिका व त्यांच्या परिवाराचा सर्वांनी सन्मान करावा असे आग्रही प्रतिपादन प्रविण फुलारी यांनी केले.
 ते दि. 23 रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम च्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने  विमलाबाई देशमुख कन्या विद्यालयाच्या

सभागृहात आयोजित भव्य ग्रंथ व भीती पत्रकाच्या प्रदर्शन सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार शिवाजीराव पालेपाड व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून
मुख्याध्यापिका सुनिता कोयले,मुख्याध्यापिका शोभा राजपंगे, माजी नगरसेवक अभय मिरकले, मराठवाडा मुक्ती संग्राम समितीचे सदस्य प्रा.सुनील पुरी, मराठवाडा मुक्ती संग्राम समितीचे सदस्य राम तत्तापुरे,नायब तहसिलदार मुन्वर मुजावर, धनेश दंताळे,डि के मोरे यांच्या सह मान्यवरांची उपस्थित होती.
यावेळी तहसीलदार शिवाजीराव पालेपाड यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांच्या चरित्रावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचा शुभारंभ स्वातंत्र्य सैनिकाचे पत्नी श्रीमती मित्रवंदाबाई कदम आणि पत्नी श्रीमती गंगाबाई गोविंद पिचकेवाड यांचा उपजिल्हाधिकारी प्रवीण फुलारी व तहसीलदार शिवाजी पालेपाड यांच्या हस्ते सत्कार करून व फित कापून उद्घाटन करण्यात आले.
प्रास्ताविक सुनील गिरी यांनी सूत्रसंचालन चंद्रकांत पेड यांनी आभार उषा रेड्डी यांनी मानले.
या सोहळ्याच्या निमित्ताने तहसील कार्यालयात रक्तदान शिबिर घेऊन त्यात 21 लोकांनी स्वयंप्रेरणेने रक्तदान केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आणि विमलाबाई देशमुख विद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

About The Author