उदगीर येथे श्री स्वामी समर्थ मुर्तीची नवीन वास्तूमध्ये स्थलांतर होणार 

उदगीर (प्रतिनिधी) : येथील देगलूर रोडवर शेटकार इस्टेट येथे श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असून याठिकाणी नवनिर्मित वास्तूमध्ये या केंद्राचे स्थलांतर व श्री स्वामी समर्थ मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात येणार आहे. याप्रसंगी श्री क्षेत्र अक्कलकोट श्री स्वामी समर्थ समाधी मठ देवस्थान येथील स्वामींचे मूळ पादुकाचे आगमन, महापूजन व दर्शन सोहळा कार्यक्रम ही संपन्न होणार आहे.

उदगीर येथे श्री स्वामी समर्थ मुर्तीची नवीन वास्तूमध्ये स्थलांतर होणार 

शनिवार दि.२६ ऑगस्ट रोजी संकल्प, गणेश पूजन, पुण्यवाचन, देवनांदी, ब्रम्हवृत्त्विकवर्ण मंडल देवता स्थापना, मुख्यदेवता स्थापन, पंचगव्य होम, शांती होम, मूर्तीस जलादिवास, मंगल आरती, वेद सेवा व स.१० व सायं. ६ वा. आरती. रविवार दि. २७ ऑगस्ट रोजी मंडल देवता पुजन, नवग्रह होम, प्रसाद वास्तु होम, प्रतिष्ठापना होम, मुर्तीस आदिवास, धान्यदिवास, मंगल आरती वेद सेवा, श्री स्वामी समर्थ मुळ पादुका पुजन व दर्शन, स. १० वा. पुजा व स.११ पासून पादुका दर्शन. सोमवार दि.२८ रोजी मंडल देवता पुजन प्रतिष्ठापना अंग होम, पर्याय होम, श्री दत्त याग, श्री स्वामी याग, श्री लक्ष्मी याग श्री समर्थ मुर्ती प्राणप्रतिष्ठा, तत्वन्यास, कल्यान्यास, प्रधान देवता हवन, बली पूर्णाहुती, महानैवेद्य महाआरती दु.१२:३० वा. आशीर्वचन, महाप्रसाद दु.१ ते सायं ६ याप्रमाणे कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून सर्व भक्तजणांनी या सर्व कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन प्रमोद शेटकार, अपेक्षा शेटकार, बालाजी डोईजोडे व गोल्डन वुड्स सोसायटीकर व स्वामी समर्थ सेवेकरी मंडळींनी केले आहे.

About The Author