चंद्रयानाची प्रतिकृती तयार करून आनंदोत्सव

चंद्रयानाची प्रतिकृती तयार करून आनंदोत्सव

उदगीर (प्रतिनिधी) : मिशन चंद्रयान-3 यशस्वी झाल्यानंतर अर्थात चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे उतरल्यानंतर, भारतासह जगभरातील नागरिकांनी आनंदोत्सव साजरा केला. तशाच पद्धतीने उदगीर येथील तरुणांनीही ढोल ताशाच्या गजरात चांद्रयान 3 ची प्रतिकृती तयार करून छत्रपती शिवाजी महाराज चौकात आनंद उत्सव साजरा केला. यावेळी प्राधान्याने श्रीराम प्रतिष्ठान, संघर्ष मित्र मंडळ, नवयुवक व्यापारी गणेश मंडळ, मोरया ढोल पथक, नारायणा ऍग्रो ऑइल्स प्रा. शेल्हाळ, गोरक्षण संस्था सोमनाथपूर यांच्यासह विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आनंद उत्सव साजरा केला. चांद्रयानची प्रतिकृती उदगीर येथील सुरेश बोडके आणि पेंटर गंगाधर आर्य यांनी तयार केली आहे. या उत्कृष्ट प्रतिकृती बद्दल त्यांचेही सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

About The Author