श्री व्यंकटेश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात व्याख्यान
देवणी (प्रतिनिधी) : देवणी तालुक्यातील वलांडी येथे श्री व्यंकटेश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या अमृत महोत्सव वर्षा निमित्य शिक्षण विभागाने राबवलेल्या उपक्रमावर्गत, प्रसिद्ध, कवि, लेखक, निवेदन, व्याख्याते, जगदगुरु तुकोबाराय साहित्य परिषद महाराष्ट्र राज्याचे प्रदेश संघटक सतिषराव हाणेगावे यांचे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
अध्यक्षस्थानी प्राचार्य मांजी बाळासाहेब हे होते तर प्रमुख, पाहुणे म्हणून सतिष हाणेगावे हे उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांचा सत्कार पर्यवेक्षक रणजीत पाटील यांनी केले.प्रास्ताविक चंद्रकांत माने यांनी केले. यावेळी मुख्य वक्ते हाणेगावे यांनी मराठवाडा मुक्तिसंग्राम कसा व का घडला या विषयीचा इतिहास विद्यार्थ्यांना सांगितला. यावेळी प्राचार्य तथा मुख्याध्यापक मांजीबाळे, पर्यवेक्षक रणजीत पाटील,धनाजी पाटील,दिलीप बच्चेवार,नामदेव कारभारी, बिराजदार नंदकिशोर, अविनाश कटके,संतोष ऊपासे,विश्वास आळंदीकर,कदम साधू,सगर बालाजी,कोळी तानाजी,रणजित हूडे,उमाकांत भोसले, सुधीर माने,भोसले ज्योतीराम,सचिन शिंदे, दायमी ताकदीश,सय्यद ताजोद्दिन,रमेश माने,डोंगरे संदिप, संजय शेरिकाचे,राजीव तूगावे,खरटमोल बाळाप्पा,बिराजदार शंकरराव, पाटील अमित, सौ कोमलताई बिराजदार,महानंदाताई पाटील, सौ ज्योती ताई कारागिर,सौ कीतीताई पाटील, बोरोळे राजकुमार, रतन भंडारे,राम विजापूरे,भागवत मोदाळे,दिलीप कांबळे, हे उपस्थित होते. सूत्रसंचालन बिराजदार नंदकिशोर यांनी तर आभार प्रा.रणजित हूडे यांनी मानले.