राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाल उपाध्याय महाविद्यालयात युवा मतदार नोंदणी २०२३ विशेष शिबिर संपन्न
देवणी (प्रतिनिधी) : मतदार यादी हा लोकशाहीचा पाया असून तो सशक्त करण्यासाठी मा. भारत निवडणूक आयोगाचा विशेष कार्यक्रमाचे आयोजन देवणी येथे करण्यात आले होते.मतदार यादी सशक्तीकरणासाठी मतदारांमध्ये जनजागृती करून युवा मतदारांची नोंदणी वाढविणे, मतदार यादी अद्यावत करणे हे राष्ट्रीय कार्य समजून लातूर जिल्हाधिकारी तथा लातूर जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार पंडित दीनदयाल उपाध्याय महाविद्यालयात युवा मतदान नोंदणी अभियान दिनांक २१ ते २३ ऑगस्ट २०२३ दरम्यान ज्या विद्यार्थ्यांचे अद्याप पर्यंत मतदान यादीमध्ये नाव नाही,तसेच ३० सप्टेंबर २००६ पूर्वी जन्मलेल्या विद्यार्थ्यांसाठी दि. २१ ऑगस्ट ते २३ ऑगस्ट २०२३ दरम्यान महाविद्यालयात युवा विद्यार्थी मतदार नोंदणी विशेष अभियान राबविले असून, या शिबिराच्या पहिल्या दिवशी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. बी. एन. नागलगावे यांच्या अध्यक्षतेखाली महाविद्यालयाचे नोडल अधिकारी प्रा. डॉ. कांत जाधव, लक्ष्मण कांबळे नोडल अधिकारी तथा देवणी तलाठी यांच्या हस्ते मतदार नोंदणी अर्ज वाटप करण्यात आले.त्याचप्रमाणे देवणीचे तलाठी लक्ष्मण कांबळे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मतदार यादीत नव्याने नाव नोंदणी ,मतदार यादीतील नाव वगळणे, तसेच मतदार यादीतील नाव व कार्डाची दुरुस्ती, नोंदणी बाबत सविस्तर मार्गदर्शन केले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी प्राचार्य डॉ. बी. एन. नागलगावे, नोडल अधिकारी डॉ. कांत जाधव, संजय डोंगरे , डॉ. ए.के सोनवणे, डॉ. के.एन .सय्यद, डॉ. बी. एस.धोतरे, डॉ. जान अहमद के.जे., प्रा. रवी धुळे ग्रंथपाल, व्ही.व्ही.खादीवाले, व्ही.व्ही .धोंडीहिप्परगेकर, डाॅ. एस.टी.हैबतपुरे, बी.बी.डोंगरे, ए.बी.चलवा, एस.व्ही.शिंदे, मादळे ,प्रशांत सिध्देश्वर आणि महाविद्यालयातील विद्यार्थी व इतर सर्व कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक उपस्थित होते.