स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठात तृतीय आल्याबद्दल कु.अनिशा घोडके हिचा प्रा.सिद्धेश्वर पटणे व मित्र परिवाराच्या वतीने सत्कार
उदगीर (प्रतिनिधी) : येथील कु.अनिशा गोपाळकृष्ण घोडके ही एम.एस्सी वनपतीशास्त्र(बॉटनी) या विषयात 92.36% गुण घेऊन स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठात सर्वतृतीय आली आहे. उदगीरच्या शिवाजी महाविद्यालयात शिकत असलेली कु.अनिशा गोपाळकृष्ण घोडके ही शालेय जीवनापासूनच, स्कॉलरशिप, केंद्र शासनाच्या एन.एम.एम.एस परीक्षेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावून शालेय जीवनपासूनच आपल्या गुणवत्तेची चुनुख दाखवलेली आहे, तीने आपली ही गुणवत्ता कायम राखत विद्यापीठात तृतीय येऊन आपल्या शिरपेचात यशाचा आणखीन एक तुरा रोवलेला आहे. तसेच शिवाजी महाविद्यालयाचे नावही उंचावले आहे. तीने तिच्या यशाचे श्रेय महाविद्यालयातील सर्व गुरुजणांना बरोबरच, तिचे आजोबा माजी कृषी अधिकारी दत्तात्रय घोडके, आज्जी सौ.लक्ष्मीबाई घोडके, मामा माजी जिल्हा परिषद सदस्य बाबुराव गिरे पाटील, आत्या सौ.प्रेमाताई गिरे पाटील, वडील पी.टी.ए चे राज्य उपाध्यक्ष प्रा.गोपाळकृष्ण घोडके, आई सौ.राधिका घोडके, मामा जळकोटचे आरोग्य अधिकारी डॉ. संजय पवार, मामी सौ.सीमा पवार, काका श्री महेश घोडके, काकु सौ.मेघा घोडके, तैवान येथे शास्त्रज्ञ असलेले राम आंब्रे, सुप्रसिद्ध उद्योगपती दिपक आंब्रे, तैवान येथे कार्यरत असलेले पंडित आंब्रे इत्यादींना आपल्या यशाचे श्रेय दिले आहे. तिच्या या घवघवीत यशाबद्दल उदगीर येथील इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसचे संचालक प्रा.सिद्धेश्वर पटणे, प्रा.सूर्यकांत बिचकुंदे, प्रा.प्रदीप वीरकपाळे, प्रा.रामचंद्र बिरादार, प्रा.गंगाधर पाटील, प्रा.पांडुरंग फड, प्रा.शिवाजी हंचनाळे, प्रा.संजय जामकर, प्रा.राजकुमार बिरादार, प्रा.संतोष चौधरी इत्यादींनी तिचा यथोचित सत्कार करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या, व कु.अनिशा लवकरच डॉक्टरेट प्राप्त करेल असा विश्वास व्यक्त केला.