अनिल सोमवंशी यांची जिल्हा अध्यक्ष पदी निवड
उदगीर (प्रतिनिधी) येथील युवा नेते अनिल सोमवंशी यांची निवड काँग्रेस पक्षाच्या युवक व क्रीडा विभाग लातूर जिल्हा अध्यक्ष (ग्रामीण) पदी करण्यात आली आहे.
निवडीचे पत्र या विभागाच्या प्रदेश अध्यक्ष सो.समिता गोरे यांनी दिले आहे. अनील सोमवंशी यांच्या आज पर्यंत केलेल्या सामाजिक कार्याची नोंद घेऊन सदरील निवड करण्यात आली आहे.तसेच भविष्यात त्यांच्या हातून पक्ष संघटना बांधणीसाठी तळागाळातील लोकांपर्यंत पक्षाची ध्येय धोरणे पोंहचवण्यात सक्रिय राहतील, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
या निवडीच्या संदर्भात बोलतांना अनिल सोमवंशी यांनी सांगितले की, पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर फार मोठा विश्वास दाखवला असून त्या विश्वासाला पात्र राहण्यासाठी मी सदैव प्रयत्न करेन. काँग्रेस पक्षाची प्रतिमा समाजामध्ये उज्वल करण्याच्या दृष्टीने युवकांमध्ये प्रेरणा निर्माण करून जनजागृतीचे काम हाती घेईन. ज्यामुळे पक्षश्रेष्ठींना माझ्या कार्याबद्दल समाधान वाटेल. माझी निवड सार्थ आहे, असे वाटण्या इतपत पक्ष संघटन बांधणीचे काम मी करून दाखवेन. पक्षश्रेष्ठींना मान खाली घालावी लागेल असे कोणतेही कृत्य माझ्या हातून कदापि होणार नाही. अशी खात्री प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना त्यांनी दिली.