प्रोफेसर डॉ. नरसिंग कदम यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

उदगीर : येथील साहित्यिक तथा सामाजिक कार्यकर्ते डॉ. कदम नरसिंग यांना समृद्धी प्रकाशन हिंगोली यांच्या वतीने स्वर्गीय मारोतराव कऱ्हाळे राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2023 नुकताच जाहीर झालाआहे. त्यांची ही निवड शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबाबत तसेच सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल झालेली आहे.
हा राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2023 साठीचा जाहीर केल्याचे संयोजक शिवाजी महाविद्यालय हिंगोली येथील मराठी विभाग प्रमुख डॉ. श्रीराम कऱ्हाळे यांनी पत्र देऊन कळविले आहे .

प्रोफेसर डॉ. नरसिंग कदम यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर


डॉ. नरसिंग कदम यांनी आतापर्यंत अनेक पुस्तकांचे लेखन केलेले आहे. यापूर्वी कदम यांना साहित्य लेखनाबद्दल, सामाजिक कार्याबद्दल व शैक्षणिक कार्याबद्दल अशा तीन क्षेत्रातील अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांच्या या सन्मानाबद्दल समाजातील सामाजिक, शैक्षणिक ,साहित्यिक अशा विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

About The Author

error: Content is protected !!