राष्ट्रीय सेवा योजनेकडून फुले महाविद्यालयात वृक्षारोपण

राष्ट्रीय सेवा योजनेकडून फुले महाविद्यालयात वृक्षारोपण

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या सांगता कार्यक्रमाप्रसंगी पंचप्रण या उपक्रमांतर्गत ‘मेरी माटी, मेरा देश’ या कार्यक्रमाप्रसंगी प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत अमृतकलश आणि अमृत वृक्षाचे रोपण महाविद्यालय परिसरात करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संजीवनी महाविद्यालय चापोली येथील संस्कृत विभाग प्रमुख प्रा. गणेश पेटकार यांची उपस्थिती होती. यावेळी महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी यांनी केले तर सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉ. सतीश ससाणे यांनी व आभार कार्यक्रमाधिकारी डॉ. पांडुरंग चिलगर यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी – विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author