लोकप्रतिनिधी म्हणून चळवळीतील कार्यकर्त्यांना संधी द्या – डॉ नरसिंह भिकाणे

लोकप्रतिनिधी म्हणून चळवळीतील कार्यकर्त्यांना संधी द्या - डॉ नरसिंह भिकाणे

अहमदपूर (गोविंद काळे) : ज्यांनी जनतेची अविरतपणे सेवा केली आहे व जे स्वछ प्रतिमेचे चळवळीतील उच्चशिक्षित कार्यकर्ते आहेत त्यांना जनतेने लोकप्रतिनिधी म्हणून पाठवले तरच ग्रामीण भागाचा खरा विकास होईल असे प्रतिपादन मनसे जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाणे यांनी अहमदपूर तालुक्यातील विळेगाव येथे मनसे शेतकरी मदत अभियान अंतर्गत मोफत खतवाटप कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर सरपंच शंकर देवकते, तंटामुक्ती अध्यक्ष नामदेव देवकते,उपसरपंच मोनिकबाई तेलगे,ग्रामपंचायत सदस्य नवनाथ तरुडे,ग्रामपंचायत सदस्य बालाजी मोरे आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्ता सोळंके यांनी केले.पुढे बोलताना डॉ भिकाणे यांनी समाज जर संतांनी घालून दिलेल्या आदर्श वचनांवर चालला तर त्यातून जन्म घेणारे नेतेही आदर्शवतच निघतील व कोलांट्या उड्या मारून तुमची आमची मान झुकवणार नाहीत.या वेळी डॉ भिकाणे यांनीं अल्पभूधारक शेतकरी अनतेश्वर तेलंगे,बाजीराव देवकते,किशन मोरे,सय्यद पाशा,गजानन तेललवर,उमाकांत डुब्बेवार,मंचक शेळके,गोविंद सुरणर,चंद्रकांत सुरणर,राम देवकते यांना मोफत खत वाटप करण्यात आला.आजपर्यंत डॉ भिकाणे यांनी 40 शेतकऱ्यांना विळेगाव सह मानखेड,धानोरा,कोपरा या गावी खतवाटप केले आहे.या कार्यक्रमाच्या वेळी तालुकप्रसिद्धिप्रमुख अजय तुपकर,उत्तम देवकते,रफिक शेख,मधुकर देवकते,राम उकाळे, व्यनकटी चिंचोळकर,नामदेव चिंचोलकार, कोंडीबा देवकते आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author