किनगाव येथील गोसावी समाज स्मशानभूमीस जागा उपलब्ध करून देण्याची गोसावी समाज संघटनेची मागणी
अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील सर्वात मोठे गाव असलेल्या मौजे किनगाव येथील गोसावी समाज समाजाला स्मशानभूमीस सध्य परीस्थितीत जागा नसल्याने अंत्यसंस्कारा साठी मोठी अडचण येत आसल्याने तात्काळ जागा उपलब्ध करून देण्याची मागणी एका निवेदनाद्वारे अहमदपूर तालुका गोसावी समाज संघटनेचे तालुका अध्यक्ष गोविंद गिरी यांनी अहमदपूरच्या तहसीलदाराकडे केली असून सदरील निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी लातूर, सरपंच, उपसरपंच, ग्राम विकास अधिकारी ग्रामपंचायत किनगाव यांना देण्यात आली आहे. किनगाव येथे मोठ्या प्रमाणात गोसावी समाज बांधव वास्तव्यास असून समाजाला स्वतंत्र स्मशानभूमीस जागा उपलब्ध नसल्याने नाविलाजाने धर्माच्या विरोधात जाऊन प्रेत पुरण्या ऐवजी सार्वजनिक स्मशानभूमीत प्रेत जाळावे लागत आहे. त्यामुळे किनगाव येथे गोसावी समाजाला अंत्यसंस्कारासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. त्याच बरोबर अहमदपूर व चाकुर तालुक्यातील अनेक गावामध्ये गोसावी समाजासाठी स्वतंत्र स्मशानभूमी नसल्याने अंत्यसंस्कारा साठी मोठी अडचणी येत आहेत. अहमदपूर व चाकुर तालुक्यातील प्रत्येक गावातील गोसावी समाजाला स्वतंत्र स्मशानभूमीस जागा उपलब्ध करून देण्याची मागणीही यावेळी एका निवेदनाद्वारे गोसावी समाज संघटनेचे तालुका अध्यक्ष गोविंद गिरी यांनी केली आहे.