महादेव खळुरे यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य गुणगौरव पुरस्कार जाहीर
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील यशवंत विद्यालयाचे कलाशिक्षक श्री महादेव शरणप्पा खळुरे यांना महाराष्ट्र शासनाचा सन 2022-23 चा कलाक्षेत्रातील एकमेव असलेला क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य गुणगौरव पुरस्कार नुकताच जाहीर झालेला आहे. उपक्रमशील कलाशिक्षक महादेव खळुरे यांनी कलाक्षेत्रात अत्यंत उल्लेखनीय कार्य, शालांत प्रमाणपत्र परीक्षेतील नेत्र दीपक गुणवत्ता, त्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांच्या आकाशवाणी केंद्रावर मुलाखती, मतदान जनजागृती, तंबाखूमुक्त शाळा, समाज कल्याण विभागा च्या वृद्ध कलावंत समितीवर सदस्य, वर्तमानपत्रातील विविध विषयावर राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर लेख, त्यांची वेगवेगळ्या विषयावर सहा पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांच्या विद्यार्थ्यांना कला, क्रीडा क्षेत्रातील राज्य व राष्ट्रीय पातळीवर चमकले असून अखिल भारतीय संमेलनातही त्यांनी कलादालनात उल्लेखनीय कार्य केलेले आहे.
त्यांना 5 सप्टेंबर माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी त्यांचा मुंबई येथे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपत्नीक सत्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या या नेत्रदीपक यशाबद्दल शाळेच्या प्रार्थनेच्या वेळी त्यांना प्राचार्य गजानन शिंदे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि पुष्पहार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. या यशा बद्दल त्यांचे टागोर शिक्षण समितीचे अध्यक्ष डॉ. अशोकराव सांगवीकर, सचिव डी बी लोहारे गुरुजी, प्राचार्य गजानन शिंदे, उप मुख्याध्यापक राजकुमार घोटे, पर्यवेक्षक अशोक पेदेवाड, निर्मलाताई पंचगले, राम तत्तापुरे, सोमनाथ स्वामी यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन आणि कौतुक केले आहे.