शास्त्री विद्यालयात गोकुळाष्टमी निमित्त दहीहंडीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न.

शास्त्री विद्यालयात गोकुळाष्टमी निमित्त दहीहंडीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न.

उदगीर (एल.पी.उगीले) येथील लालबहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालयात श्रीकृष्ण जयंतीनिमित्त दहीहंडीचा चा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अभ्यास पूरक मंडळ बालाजी पडलवार, प्रमुख अतिथी प्रीती शेंडे ,मुख्याध्यापक अंबादास गायकवाड, उपमुख्याध्यापक संजय कुलकर्णी ,पर्यवेक्षक कृष्णा मारावार ,लालासाहेब गुळभिले ,माधव मठवाले उपस्थित होते.यावेळी श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला.
गोकुळाष्टमीनिमित्त अक्षरा दुरूगकर,सुरभी नाईक,मयूरी यांनी नाटिकेतून कृष्णलीला दाखवल्या. तर ऋतूजा सुरवसे व शरयू पांचाळ यांनी गीत सादर केले.यावेळी शालेय परिसरात उभारलेली दहीहंडी फोडण्यासाठी वेशभूषेत मुलांचे व मुलींचे मनोरे रचण्यात आले.हंडी फोडताना हाथी घोडा पालखी ,जय कन्हया लाल की या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गायत्री तोगरगे व श्रिया महामुनी , प्रास्ताविक संध्या राठोड ,आभारप्रदर्शन संपदा नातेवार हिने केले.या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कलोपासक मंडळ प्रमुख गुरुदत्त महामुनी कार्यक्रम प्रमुख सुप्रिया बुधे यांनी परिश्रम घेतले.

About The Author