अनिल सोमवंशी यांचा सत्कार संपन्न

अनिल सोमवंशी यांचा सत्कार संपन्न

उदगीर (प्रतिनिधी) उदगीर येथील युवा नेते अनिल सोमवंशी यांची निवड महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या वतीने, लातूर जिल्हाध्यक्ष पदी करण्यात आल्याबद्दल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस राजेश्वर निटुरे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी काँग्रेस पक्षाचे मागासवर्गीय सेलचे शहर अध्यक्ष शशिकांत बनसोडे, संघशक्ती बलांडे, मोहनराव पतंगे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना राजेश्वर निटुरे यांनी सांगितले की, भारतीय जनता पक्षाच्या भूलथापांना यापुढे जनता कधीही ही भिक घालणार नाही. काँग्रेस पक्ष सर्वधर्मसमभाव ही भूमिका घेऊन कार्य करत आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या हिताची बांधिलकी घेऊन लोककल्याणाच्या भावनेशी एकनिष्ठ असलेल्या कार्यकर्त्यामुळे पूर्वपदावर येईल. आणि गत वैभव प्राप्त होईल. त्यासाठी युवकांची फळी कामाला लागली आहे. अनिल सोमवंशी हे देखील पुढाकार घेऊन उत्कृष्ट कार्य करून दाखवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पक्षश्रेष्ठींनी दाखवलेला विश्वास आपण सार्थकी लावू. पक्ष संघटन बांधणीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करू. असे याप्रसंगी अनिल सोमवंशी यांनी सांगितले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन संघशक्ती बलांडे यांनी केले.

About The Author