ई सेवा केंद्र,आपले सरकार केंद्र,सेतू केंद्र, आधार केंद्र मध्ये दर फलक लावा – प्रहारची मागणी
उदगीर (एल.पी.उगीले) उदगीर व जळकोट तालुक्यातील सामान्य नागरिकांना आवश्यक दस्तावेज व प्रमाणपत्र साठी इतरत्र कुठे भटकू नये, व त्यांना एकाच छत्राखाली सर्व सेवा उपलब्ध व्हावेत म्हणून शासनाने ई सेवा केंद्र, आपले सरकार केंद्र, सेतू केंद्र, आधार केंद्र, इत्यादी ची सुविधा करून दिली आहे.
ज्यामध्ये आधार कार्ड, जातप्रमाणपत्र, नेशनिलीटी, डोमिसैल, एफिडेट, रेशनकार्ड, राजपत्र अशा अनेक सेवा उपलब्ध आहेत. सोबतच नागरिकांची लूट होऊ नये म्हणून
शासनाने यासाठी लागणारे दर (शुल्क) सुद्धा निश्चित करून दिलेली आहेत. परंतु काही केंद्र संचालक द्वारा केंद्रावर सेवानुसर दर शुल्काचे फलक (रेट बोर्ड) न लावल्याने नागरिकांमध्ये शुल्क विषयी संभ्रम निर्माण होतो, व जास्तीचे शुल्क घेऊन त्यांची आर्थिक फसणूक केली जात आहे.
शासनाने सर्वच केंद्रा साठी एक समान दर निश्चित केला असून ही दर फलक न लावल्यामुळे नागरिकांना शुल्काची माहिती मिळत नाही. यामुळे ते फसणुकी चे बळी पडतात.
शासनाचे आदेशाचे उलंघन करणारे केंद्र संचालकांवर फौजदारी गुन्हा दाखल करून केंद्राचे लायसन रद्द करण्याचे त्या अधिसूचनेत प्रावधान करावे, अशी मागणी नागरिक करत आहे. तसेच काही ई,सेवा केंद्र,एका लाॅगिन वर २ ते ३ठिकाणी केंद्र चालवले जात आहेत.ज्या ठिकाणी ची नोंदणी केलेले आहे त्या ठिकाणीच ई सेवा केंद्र चालवण्यास सुचना करावेत, असे निवेदन उपजिलाधिकारी उदगीर यांना प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकारी यांच्या वतीने देण्यात आले आहे. निवेदनाची दखल घेतली नाही तर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने पुंगी वाजवा आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रहार उपजिल्हा प्रमुख विनोद तेलंगे, जिल्हा प्रवक्तते बंडेपा पडसलगे, अध्यक्ष रविकिरण बेलकुदे, शहराध्यक्ष महादेव मोतीपवळे,ता.कार्याध्यक्ष महादेव आपटे, तालुका संघटक चंद्रशेखर बिरादार, शहर कार्याध्यक्ष शहाजान शेख, तालुका उपाध्यक्ष संदीप पवार, तालुका संघटक सोपान राजे, तालुका चिटणीस बळीराम चौधरी, शहर संघटक मधुकर गायकवाड ,तालुका सचिव अविनाश शिंदे, व इतर प्रहार सेवक उपस्थितीथ होते.