मनसेच्या आंदोलनाला यश ; अहमदपूरचे बसस्थानक झाले चकाचक

0
मनसेच्या आंदोलनाला यश ; अहमदपूरचे बसस्थानक झाले चकाचक

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील बसस्थानकातील घाणीमुळे शहराच्या मुख्य ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले होते बस स्थानक प्रशासनाने हा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा अन्यथा जिम्मेदार अधिकाऱ्याला याच घाणीमध्ये बसवण्याचा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाणे यांनी जुलै महिण्यात दिला होता या आंदोलनाला आता यश आले असुन सदरच्या परिसराची स्वच्छता करून परिसर चकाचक करण्यात आला आहे

याविषयी सविस्तर माहिती अशी की, शहरातील मुख्य ठिकाणी असलेल्या छ्त्रपती शिवाजी महाराज चौकात बस स्थानकातील घाणीमुळे या घाणीची दुर्गंधी सर्वदुर पसरत होती त्यामुळे आजुबाजुचे व्यापारी, जनता, ग्राहक, विद्यार्थी वयोवृद्ध त्रस्त झाले होते व त्यांना महामारी सारख्या रोगराईला तोंड द्यावे लागत होते तरीही बस स्थानक प्रशासनाला वारंवार घाणी संदर्भात आजुबाजुच्या व्यापाऱ्यांनी कळवुन सुद्धा जाग येत नव्हती सदरील घाणीविषयी मनसेचे जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह भिकाने यांना माहीती मिळताच त्यांनी बस स्थानक परिसरात घोषणाबाजी करत घाणीचे साम्राज्य असलेल्या भागातील खड्डयाला उपरोधिकपणे फुलांचा हार घालुन बस स्थानक प्रशासनाने हा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा अन्यथा जिम्मेदार अधिकाऱ्याला याच घाणीमध्ये बसवण्याचा इशारा जुलै महिण्यात देण्यात आला होता व त्यांनी बस प्रशासनाला व्यापारी संकुल, संरक्षण भिंत,तारेचे कुंपण,मजबुतीकरण करून स्वछता कर्मचाऱ्यांकडून दररोज स्वच्छता ठेवण्याविषयी सल्ला देण्यात आला होता.

या आंदोलनाला आता यश आले असुन सदरच्या परिसराची स्वच्छता करून बस स्थानक प्रशासनाच्या वतीने तेथे व्यापारी संकुल उभे करण्यात आले आहे व उर्वरीत जागेवर खाजगी वाहनांकरीता वाहनतळ तयार करून परिसर चकाचक करण्यात आला आहे. मनसेच्या आंदोलनाला यश आल्यामुळे परिसरातील व्यापारी, ग्राहक, जनता, विद्यार्थी, वयोवृध्द यांनी मनसे जिल्हाध्यक्ष नरसिंह भिकाने यांचे आभार मानले आहेत. आंदोलनात मनसेचे तालुका उपाध्यक्ष उत्तम पाटील,प्रसिद्धी प्रमुख अजय तुपकर,ग्रामपंचायत सदस्य संतोष नारागुडे,चेअरमन मदन पलमटे,चंद्रकांत सांगुळे,गजानन पांगरे,सतीश करपुडे,अजय तुपकर,शिवराज कासले,लक्ष्मण भदाडे, बाबुराव लांडगे,व्यनकट गायकवाड,मनोज पाटील,बाबाराव आढाव,व्यनकट कदम,मनोज पाटील,ज्ञानेश्वर तलवार,उद्धव कदम,रितेश आढाव,गोविंद आढाव,उद्धव गायकवाड आदींसह मनसे कार्यकर्ते यांनी सहभाग नोंदवला होता.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!