यशवंत विद्यालयात संत श्री गाडगेबाबा यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी
अहमदपूर (गोविंद काळे) : समाजातील गोरगरीब, दीनदलित, शोषित, पीडित यांच्यातील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी शालेय जीवनामध्ये संत श्री गाडगेबाबांच्या स्वच्छतेचा आदर्श जीवनामध्ये घ्यावा असे आग्रही प्रतिपादन पर्यवेक्षक राम तत्तापुरे यांनी केले. ते दि. 20 रोजी संत श्री गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य गजानन शिंदे, उपमुख्याध्यापक राजकुमार घोटे, परवेक्षक अशोक पेदेवाड यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी ते पुढे बोलताना श्री तत्तापुरे म्हणाले की, आळस, अज्ञान आणि अंधश्रद्धा हे मानवाचे तीन शत्रू असून यावर जो मात करतो तो जीवनामध्ये यशस्वी होतो. प्रारंभी संत श्री गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला प्राचार्य गजानन शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनंजय तोकले यांनी तर आभार श्रीधर लोहारे यांनी मानले. कार्यक्रमाचे स्वीकारण्यासाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.