अहमदपूर शहराच्या स्वच्छतेसाठी नगरपालिकेच्या सहा नविन गाड्या सज्ज

0
अहमदपूर शहराच्या स्वच्छतेसाठी नगरपालिकेच्या सहा नविन गाड्या सज्ज

अहमदपूर ( गोविंद काळे) शहरातील तयार होणारा घनकचरा गोळा करण्यासाठी नगरपालिकेने नव्याने सहा घंटागाड्या खरेदी केल्या असून मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांच्या हस्ते १८ डिसेंबर रोजी नगर परिषद परिसरात विधीवत पूजा करून त्या घंटागाड्या कार्यान्वित करण्यात आल्या.
https://policeflashnews.com/?p=40446

अहमदपूर नगर पालिकेकडे जुन्या आठ घंटागाड्या असून घनकचरा गोळा करण्यासाठी त्या कमी पडत
होत्या. त्यामुळे स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत नव्याने सहा नवीन घंटागाड्या खरेदी केल्या असून आत्ता
एकूण १४ घंटागाड्या झाल्या आहेत.त्यामुळे प्रत्येक वॉर्डासाठी एक घंटागाडी उपलब्ध होणार आहे. यामुळे
शहरातील प्रत्येक ठिकाणी घंटागाडी उपलब्ध होणार असून शहरातील घनकचरा वाहून नेण्यास मदत होणार आहे. नागरिकांनी आपल्या घरात जमा होणारा ओला व सुका कचरा वेगळा करून तो रस्त्यावर इतरत्र न टाकता तो घंटागाडीतच टाकावा व आपला परिसर स्वच्छ ठेवावा, असे आवाहन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी केली आहे.
यावेळी नगरपालिकेतील कार्यालयीन अधीक्षक विठ्ठल भंडे, नगररचनाकार अजय कस्तुरे, लेखापाल राहुल येलगटे, पाणीपुरवठा अभियंता गणेश पुरी, शेख मुसा, साहेबराव शेवाळे,हबीब मुसा, सुनील सोनकांबळे, सतीश ससाणे, धनराज कांबळे, राहुल
भाग, धम्मानंद ढवळे, जिलानी शेख, यासह नगर परिषदेचे अनेक कर्मचारी आदींची उपस्थिती होती.

शहरातील प्रत्येक ठिकाणी दररोज घंटागाडी जाईल याची व्यवस्था करण्यात येणार आहे. नागरीकांनी आपला घरघुती तयार होणारा कचरा वेगवेगळा करून घटांगाडीतच टाकावा, यापुढे शहरामध्ये कोठेही उघड्यावर/गटारीत कचरा न टाकण्याचे व आपआपला परीसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!