संत ज्ञानेश्वर विद्यालयात संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी साजरी
अहमदपूर (गोविंद काळे) : 67 वर्षांपूर्वी आपल्या कीर्तनातून समाज प्रबोधन करणारे, राष्ट्रसंत, स्वच्छता संत डेबूजी झिंगराजी जानोरकर उर्फ संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात पाचवीच्या वर्गाकडून कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक आशा रोडगे तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्था समन्वयक कुलदीपजी हाके उपस्थित होते. प्रारंभी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी इयत्ता पाचवीतील विद्यार्थ्यांनी वर्गशिक्षिका प्राजक्ता भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली संत गाडगेबाबा यांच्या वेशभूषेतील जीवंत देखावा व गाडगेबाबांच्या जीवनावर आधारीत नाटिका सादर केली. सृष्टी कांबळे , तिगोटे श्रेया या दोन विद्यार्थिनींनी संत गाडगेबाबा यांच्या वेशभूषेत येऊन त्यांचे विचार व भजन गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला सादर केले.
संकेत कदम व करण सावरगावकर यांनी स्वच्छते विषयी कविता सादर केली. त्यानंतर विद्यार्थ्यांना केळी वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मीना तोवर, संगीता आबंदे, अर्चना जांभळदरी सुजाता बुरगे,अयोध्या जाधव, ज्ञानेश्वर चव्हाण सह विद्यार्थी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी पहिली ते सातवीतील विद्यार्थ्यांची संत गाडगेबाबा यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारी भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पाचवीच्या वर्गशिक्षिका प्राजक्ता भोसले यांनी केले. तर सूत्रसंचालन सतीश साबणे व आभार सविता पाटील यांनी मानले.