तणाव मुक्तीसाठी शालेय जीवनात शांतता आणि मनाची एकाग्रता महत्त्वाची – प्रा. ई व्ही स्वामीनाथन यांचे प्रतिपादन
अहमदपूर (गोविंद काळे) : आज समाजामध्ये कुटुंबातील सर्व सदस्य आपापल्या कामांमध्ये व्यस्त आणि काम नाही झाल्यास तणावांमध्ये आहेत. त्यामुळे तणाव मुक्तीसाठी शालेय जीवनात शांतता आणि मनाची एकाग्रता करणे महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन मुंबईतील प्रेरणादायी वक्ते प्रा .इ व्ही स्वामीनाथन यांनी केले. ते दि. 21 रोजी प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वतीने आयोजित यशवंत विद्यालयात एक दिवसीय तनाव मुक्त जीवन जगण्याची कला या प्रशिक्षणात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य गजानन शिंदे, प्रमुख अतिथी पर्यवेक्षक राम तत्तापुरे, ओम शांती केंद्राचे जितेंद्र कोहाळे,महादेव खळुरे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी ते पुढे बोलताना श्री प्रा. स्वामीनाथन म्हणाले की, विद्यार्थी जीवन सुखी आणि समाधानी करायचा असेल तर शरीराला व्यायामाची आणि मनाला एकाग्रतेची गरज असल्याचे सांगून टेन्शन पेक्षा टेक्नॉलॉजीला महत्त्व द्या. तनावाचे मॅनेजमेंट करा असे जाहीर आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक राम तत्तापूरे यांनी सूत्रसंचालन डॉ. शरद करकनाळे यांनी तर आभार गौरव चवंडा यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विजय चव्हाण,दीपक हिंगणे,गुरप्पा बावगे,हरीगीर गिरी,योगेश बिरादार,सौ. मधुबाला आंधळे,सौ.प्रतिभा सोलपुरे व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
https://policeflashnews.com/?p=40433