लाल बहादूर शास्त्री प्राथमिक विद्यालयात गीता जयंती उत्साहात संपन्न
उदगीर (एल.पी.उगीले) : भारतीय शिक्षण प्रसारक संस्था,अंबाजोगाई संचलित लाल बहादूर शास्त्री प्राथमिक शाळेत बाल मनावर गीतेतील संस्कार रुजावेत,या उद्देशाने गीता जयंतीनिमित्त सामूहिक गीता पठणाच्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून संस्कार केंद्र प्रमुख अंकुश मिरगुडे तर, प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक प्रमोदजी मारोती देशपांडे,चिन्मय मिशनच्या कार्यकर्त्या सौ.अर्चना चिकटवार, विभाग प्रमुख सुधाकर पोलावार,सुरेखाबाई कुलकर्णी व गीता पाठांतर प्रमुख श्रीमती निता वट्टमवार उपस्थित होते.तसेच विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून इयत्ता पहिली वर्गातील चि.व्यंकटनाथ पोलावार व कु.ओवी बानापुरे कृष्ण व राधाच्या वेशभूषेत उपस्थित होते. सर्वप्रथम व्यासपीठावरील पाहुण्यांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन, ‘ श्रीमद्भगवद्गीता’ या पवित्र ग्रंथाचे पूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले. प्रमुख अतिथींचे शाल व गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांनी श्रीमद्भगवद्गीतेतील पंधराव्या अध्यायाचे अतिशय सुंदर पध्दतीने सामूहिक पठण केले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रमोदजी देशपांडे यांनी सांगितले की, भगवद्गीता हा हिंदू धर्माचा पवित्र ग्रंथ आहे.विद्यार्थ्यांनी गीतेतील श्लोक खूप छान पध्दतीने पठण केले आहेत.प्रत्येक समस्येचे समाधान गीतेतून मिळते.ईश्वराला प्रिय कामे करा.भगवतगीतेबद्दल मार्गदर्शन केले.https://policeflashnews.com/?p=40477
अध्यक्षीय समारोपपर भाषणात मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे यांनी जगातील सर्वश्रेष्ठ तत्वज्ञान गीतेत आहे.पाठांतरावर भर देऊन अधिकाधिक चांगले काम करीत राहण्याचे आवाहन केले. स्वागत व परिचय श्रीमती सुरेखाबाई कुलकर्णी यांनी केले.प्रास्ताविक गीता पाठांतर प्रमुख श्रीमती निता वट्टमवार यांनी केले तर,सुत्रसंचलन सौ.मंजुषा पेन्सलवारबाईंनी केले.आभार माधव केंद्रे यांनी मानले.कार्यक्रमाची सांगता सामूहिक पसायदानाने झाली.कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
