किलबिलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

0
किलबिलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

किलबिलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील किलबिल नॅशनल स्कुल शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन दि. 20 व 21 जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी उद्घाटक म्हणून अहमदपूर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक सुधाकर देडे तर अध्यक्ष म्हणून संस्थेचे कोषाध्यक्ष बालासाहेब कदम तर प्रमुख पाहुणे म्हणून नेटिझन्स फाउंडेशन स्कूल लातूर चे संचालक सुधाकर तोडकर , कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामदास कदम, जवळगा कोकणगा ग्रामपंचायतचे माणिक कदम, शाळेचे सल्लागार प्राचार्य मनोज सावळे, ग्लोबल शाळेचे संचालक शंकर अबरबंडे, संस्था सचिव ज्ञानोबा भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात विविध कलागुणांना वाव देत तबला, ढोलक,कांगो, पियानो, गिटार याचे वादन करत गितगायन केले तसेच स्टँडउप आर्ट डेमो चे सादरीकरण केले. मराठी हिंदी युगुल गीतासह लावणी, गोंधळ, शेतकरी गीत, कोळीगीत यावर ठेका धरत बालकलाकारांनी आपल्या अंगी असलेल्या सुप्त गुणांची मुक्त उधळण करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कला गुणांना वाव मिळून विद्यार्थी सभाधीट होण्यासाठी वार्षिक स्नेह संमेलन आयोजित केले जाते.
तर कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कूल लातूर चे डायरेक्टर बी. ए. मेंदर्गी, गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड नृत्यांगना कु. सृष्टी सुधिर जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव ज्ञानोबा भोसले तर व्यासपीठावर संजीवनी जगताप, विजयकुमार भोसले, उपप्राचार्य राजेंद्र धिवरे, माधव नगराळे, सुरेखा भोसले, सरोजा भोसले, प्राचार्य संतोष पाटील उपस्थित होते. मैंदर्गी सर बोलताना म्हणाले की आजच्या शैक्षणिक कार्यप्रणालीत डोळस पालकत्वाची गरज आहे. विद्यार्थी सर्व गुणसंपन्न बनवण्यासाठी शिक्षक पालक व शाळा यांचा समन्वय असणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले. याप्रसंगी कु सृष्टी जगताप ही कशी घडली व तिने जागतिक रेकॉर्ड कसे केले हेही सांगत एक कथ्थक नृत्य सादर करून आपली कला दाखवली. शालेय राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविलेल्या जान्हवी जाधव हीची सलग दोन वर्ष खेलो इंडिया साठी निवड झाल्याबद्दल तिचे आईवडील गणपतराव जाधव व मीनाक्षी जाधव यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महावीर गोडभरले, समरीन शेख यांनी केले तर प्रास्ताविक शाळेचे प्राचार्य संतोष पाटील यांनी केले व आभार सचिन जगताप यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अपार मेहनत घेतली. कार्यक्रमास पालकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *