बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी
उदगीर (एल.पी.उगीले)
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त अभिवादन सोहळा बाळासाहेब ठाकरे चौकात संपन्न झाला. यावेळी प्रकाश हैबतपुरे विधानसभा समन्वयक,अरुणताई लेंडाणे सहसंपर्कप्रमुख महिला आघाडी,सचिन साबणे शिक्षकसेना,अनिल पंचाक्षरी प्र.शहरप्रमुख,जितेंद्र मादलापूरकर संभाजी ब्रिगेड जिल्हाअध्यक्ष, राजकुमार माने तालुका अध्यक्ष संभाजी ब्रिगेड,कैलास पाटील माजी तालुका प्रमुख,महेश फुले उपतालुकप्रमुख, मनोज फुले,मुन्ना पांचाळ माजी शहरप्रमुख, अरुण बिरादार तालुका समन्वयक,निलेश विभूते,ऍड बबन जाधव,व्येंकट साबणे,विष्णू चिंतालवार,श्याम तवर,ज्ञानेश्वर भोईवाडा,वीरेंद्र स्वामी,शामद पठाण,विशाल गोटमुखले,गुरु कोरके,सुरज कंचे,आकाश घोडके, ओमकार सांडगे,अमोल पाचंगे, रमाकांत जाधव,संतोष निडेबने,अक्षय श्रीवास्तव,प्रा.श्रीराम सगर,राम सूर्यवंशी,सरोजा बिरादार,प्रा.रणजीत शिंदे विवेक बेलकुंदे प्रज्ञाताई सूर्यवंशी,शरद सावरे,रवी पदमपल्ले आदी मान्यवर उपस्थित होते.
शिवसेनेची स्थापना करून महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचा स्वाभिमान आणि सन्मान जपण्याचं कार्य बाळासाहेब ठाकरे यांनी केले. त्यामुळेच त्यांना हिंदू हृदय सम्राट म्हणून संपूर्ण देशात ओळखले जाते. स्पष्ट वक्ते हिंदुत्वासाठी वेळप्रसंगी मृत्यूला सामोरे जाण्याची तयारी अशा व्यक्तिमत्त्वामुळे त्यांच्या संघटनेला बळ मिळत गेले. महाराष्ट्रातील प्रामाणिक मराठी माणसांनी त्यांची साथ दिली. समाजातील सर्व घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मोलाचे कार्य केल्याचे याप्रसंगी शिवसेनेचे उदगीर तालुकाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वेंकट साबणे यांनी केले तर आभार प्रदर्शन शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख कैलास पाटील यांनी केले.