सावरगाव येथे शेतकरी समृद्धी अभियान, बळीराजाचा सत्कारही संपन्न
देवणी (लक्ष्मण रणदिवे) : शासनाच्या शेतकरी संपन्न सर्व योजना सर्वसामान्य शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी देवणी तालुका कृषी कार्यालय यांच्या सहकार्यातून ग्रामपंचायत कार्यालय सावरगाव येथे शेतकरी समृद्धी अभियान संपन्न झाले.ग्रामपंचायत कार्यालय सावरगाव च्या वतीने फळबाग, फुल शेती, बांबू लागवड, अल्पभूधारक बहुभुधारक शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. फळबाग या प्रकारातून बालाजी सावळे विश्व हिंदू परिषद देवणी तालुकाध्यक्ष, संगमेश्वर पाटील व रामराव जाधव, फुलशेतीत उल्हास भोसले व बळी कापडे, बांबू लागवड वैजनाथ बिरादार,अल्पभूधारक शेतकरी गौरव जगन्नाथ वाडीकर व भीम बुकेवाड, बहुभूधारक शेतकरी श्रीकांत वडले व सुग्रीव बोरुळे माजी सरपंच यांचा ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच सौ. सत्यभामा मसुरे, देवणी तालुका कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापक राहुल जाधव व कृषी सहाय्यक गुणाले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे राहुल जाधव व कृषी सहायक गुणाले यांचा सत्कार राजमुद्रा प्रतिष्ठान अध्यक्ष विश्वजीत बिरादार, सचिव संभाजी कापडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी गावातील उपसरपंच स्वाती जोळदापके, पंढरी जोळदापके, ग्राम रोजगार सहाय्यक बालाजी सावरगावकर इत्यादी मान्यवरांसह असंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते.