कृषि महाविद्यालया चे वार्षिक स्नेह संमेलन (अॅग्रीफेस्ट-२०२४) उत्साहात संपन्न
उदगीर (एल.पी.उगीले) : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी अंतर्गत कृषि महाविद्यालय डोंगरशेळकी तांडा, उदगीर येथील वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात संपन्न झाला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व आपल्या कलागुणांच्या बळावर मनाच्या आत दडलेल्या प्रतिमेला एक नवे वळण मिळावे, या उदात्त हेतुने महाविद्यालयामध्ये “अॅग्रीफेस्ट-२०२४” चे आयोजन करण्यात आले होते. या मध्ये विद्यार्थ्यांसाठी खेळ व सांस्कृतिक कार्यक्रमाचा समावेश होता. प्रथम दिवसाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. राजकुमार मस्के, प्राचार्य, महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय उदगीर यांनी केले. न.कृ.ए.ग्रा.सं, सुगाव चे उपाध्यक्ष प्रा. बाबुराव इंगळे यांनी अध्यक्षस्थान भुषवीले. तसेच डॉ.अंगदराव सूर्यवंशी प्राचार्य, कृषि महाविद्यालय डोंगरशेळकी तांडा, उदगीर, उप-प्राचार्य डॉ.अशोकराव पाटील उपस्थित होते. मान्यवरांचा यथोचीत सत्कार करण्यात आला. सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी, पारंपारीक वेशभुषा व विसंगत वेशभुषा ईत्यादीचे सादरीकरण केले. संपन्न झालेल्या क्रिकेट, खो-खो, कबड्डी, व्हॉलीबॉल, कॅरम व बुद्धिबळ विजेत्या आणि उपविजेत्या संघाना व स्पर्धकांना बक्षीस म्हणून संन्मानचिन्ह, पदक व प्रमाणपत्र उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
दुसर्या दिवसाच्या सांस्कृतिक व बक्षीस वितरण कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. अरविंद नवले, प्र.प्राचार्य, शिवाजी महाविद्याल, उदगीर कार्यक्रमा चे अध्यक्ष म्हणून श्रीयुत गंगाधरराव दापकेकर, सचिव न.कृ.ए.ग्रा. संस्था, सुगाव यांनी भुषविले. प्रमुख उपस्थिती डॉ. अंगदराव सूर्यवंशी प्राचार्य, डॉ.आशोकराव पाटील, उप-प्राचार्य, डॉ. आनंद दापकेकर, डी. डी. ओ., डॉ. शेख वसीम, उपाध्यक्ष (जिमखाना), डॉ. सुनिल पवार, सांस्कृतिक प्रमुख, प्रा. सुरेश नवले प्र. क्रीडाधिकारी हे होते. या प्रसंगी डॉ. अरविंद नवले यांनी विद्यार्थ्यांना खेळ व सांस्कृतिक कार्यक्रमा बरोबरच, शैक्षणिक अभ्यास जिद्दीने केला पाहिजे असे सांगितले. तसेच मोबाईल, इंटरनेट व विविध समाज माध्यमांचा अति वापर करणे टाळावे आसा मैलीक सल्ला दिला. तसेच विविध लोकला,लावणी, कोळी नृत्य, सुगंम संगीत गायन इत्यादीं चे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले. सांस्कृतिक कार्यक्रमातील विजेत्या व उप-विजेत्या स्पर्धकांना महाविद्यालयामार्फत बक्षीस म्हणून संन्मानचिन्ह, पदक व प्रमाणपत्र उपस्थित मान्यावरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या वार्षिक स्नेहसंमेलन “अॅग्रीफेस्ट-२०२४” आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. अंगदराव सूर्यवंशी, डॉ. अशोकराव पाटील, उप-प्राचार्य, डॉ. आनंद दापकेकर, डी. डी. ओ., डॉ. शेख वसीम, उपाध्यक्ष (जिमखाना), डॉ. सुनिल पवार, सांस्कृतिक प्रमुख, प्रा. सुरेश नवले प्र. क्रीडाधिकारी याच्या अंतर्गत विविध समीत्या गठीत करण्यात आल्या होत्या. या मध्ये डॉ. एस. एल. खटके, डॉ. के.पी. जाधव, प्रा. व्हि.एल. सोमवंशी, प्रा. एस व्ही. जाधव, डॉ. डी.एस. कोकाटे, सौ. बबीता वारद, सौ. बि.ए. निडवंचे, प्रा. एस.पी. पाटील, प्रा. एम.टी. लोंढे, प्रा.एस. आर. खंडागळे, ङॉ.एस.एन. वानोळे, डॉ. व्ही. एम. शिंदे, डॉ. एस. बी. माने, डॉ. डी.जी. पानपट्टे, डॉ. जि.एम. हमाने, प्रा. एस.टी. डफडे, प्रा. पि.एन. सराफे, श्री. बि.जी. बेंबडे, श्री. प्रमोद पाटील, श्री. बालाजी बिरादार, तसेच समस्त प्राध्यापक व कार्यालयीन कर्मचारीवर्ग यांनी बहुमोल योगदान दिले. “अॅग्रीफेस्ट-२०२४” या क्रिडा व सांस्कृतिक महोत्सवाचे उत्कृष्ट छायाचित्रण गजानन वाघमारे याने केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पवन पाटील, विशाल पाटील, वैष्णवी होंडराव, सृष्टी कोरे व डॉ. सुनिल पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले. राष्ट्रगीत गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली.