भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी माजी मंत्री विनायकराव पाटील यांची निवड

भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी माजी मंत्री विनायकराव पाटील यांची निवड

अहमदपूर (गोविंद काळे) : भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारिणीची महत्त्वपुर्ण बैठक नुकतीच मुंबई येथे पार पडली. सदरील बैठकीत अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा माजी मंत्री विनायकराव पाटील यांची भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. माजी मंत्री विनायकराव पाटील यांनी अहमदपूर व चाकुर तालुक्यासह लातूर जिल्ह्यात केलेल्या कार्याची दखल घेऊन प्रदेश भारतीय जनता पक्षाने विनायकराव पाटील यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड नुकतीच मुंबई येथे केली आहे. माजी मंत्री विनायकराव पाटील यांना प्रदेश उपाध्यक्षपदाच्या निवडीचे पत्र माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडवणीस, प्रदेश अध्यक्ष माजी मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविणजी दरेकर, प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय, माजी मंत्री आशिष शेलार, खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, माजी मंत्री आ. सभांजीराव पाटील निलंगेकर, माजी आमदार सुधाकरराव भालेराव यांच्या ऊपस्थितीमध्ये नियुक्ती करण्यात आली. माजी मंत्री विनायकराव पाटील यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्याने खासदार सुधाकर श्रुंगारे, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार रमेशअप्पा कराड, आमदार अभिमन्यू पवार, प्रदेश पॅनलिस्ट सदस्य गणेश हाके, माजी आमदार गोविंद केंद्रे, माजी आमदार बब्रुवानजी खंदाडे, माजी आमदार पाशा पटेल, प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांच्या सह लातूर जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे सर्व नेते पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी माजी मंत्री विनायकराव पाटील यांचे अभिनंदन केले असून अहमदपूर व चाकुर तालुक्यातील जनतेने फटाके फोडून, गुलालाची उधळण करत मोठा आनंदउत्सव साजरा केला.

About The Author