हातात कत्ती घेऊन फिरणाऱ्या दोघा विरुद्ध औसा येथे गुन्हा दाखल.
लातूर (एल.पी.उगीले) हातात तर ती घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या दोन युवकांच्या वृत्ती पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औसा पोलिसांनी त्या आरोपीच्या ताब्यातील धारदार करती व काठी जप्त केली आहे.
या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, लोकसभा निवडणूक 2024 अनुषंगाने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी अवैध शस्त्रांचे संबंधाने माहिती काढून त्यावर कारवाई करणे बाबत निर्देशित केले होते. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, उपविभागीय पोलिस अधिकारी, औसा सुनील गोसावी यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे औसा चे पोलीस निरीक्षक सुनील रेजीतवाड यांचे नेतृत्वात पोलीस ठाणे स्तरावर अधिकारी अमलदारांचे पथक तयार करुन अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमांच्या विरुद्ध कडक कार्यवाही करण्यात येत आहे.
याच संबंधाने माहिती काढत असताना सदर पथकाला माहिती मिळाली की, औसा शहरातील याकतपूर मोड परिसरामध्ये दोन युवक हातात धारदार कत्ती व काठी घेऊन दहशत निर्माण करीत फिरत आहे. अशी माहिती मिळाल्याने सदर पथकाने तात्काळ याकतपूर मोड परिसरात जाऊन हातात धारदार लोखंडी कत्ती व काठी घेऊन फिरणारे युवक नामे रसूल खय्युम शेख, (वय 28 वर्ष,राहणार कव्वा नाका, लातूर), लखन कैलास रणदिवे, (वय 32 वर्ष, राहणार माताजी नगर, लातूर).
यांना ताब्यात घेतले असता त्याच्याकडे एक लोखंडी धारदार कत्ती व एक काठी मिळून आली. सदरची कत्ती व काठी जप्त करण्यात आली असून सदर युवकावर पोलीस ठाणे औसा येथे कलम 4, 25 भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे व जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी लातूर यांचे आदेशाचे उल्लंघन केले म्हणून 135 मुंबई पोलीस अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यास आलेला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बोईनवाड हे करीत आहेत.
सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात व पोलीस निरीक्षक सुनील रेजीतवाड यांचे नेतृत्वात पोलिस अंमलदार वाडकर, डीगे, हिंगणे, होगाडे, पाटील यांनी केली आहे.