पोलीस फ्लॅश न्यूज च्या बातमीचा दणका !!श्रमीक क्रांती आभियान व एकल महिला संघटनेच्या पाठपुराव्याने राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेच्या एकोणीस लाभार्थ्यांना लाभ !!
देवणी (लक्ष्मण रणदिवे)
दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील कर्त्या कमावत्या व्यक्तीचे निधन झाल्यावर ते कुंटुंब चोही बाजुने उघड्यावर येते, व त्यांना नितांत आधाराची गरज असते आणि वेळेत आधार नाही मिळाल्यास ते कुंटुंब कोलमडुन पडते,कर्ता व्यक्ती दगावल्या काळात कुंटुंबावर उपासमारीचे संकट निर्माण होऊ नये, किंवा ते कुटुंब कोलमडुन पडु नये, म्हणुन किंवा कोलमडलेले कुंटुंबांला पुर्ववत उभं रहाण्याचा प्रयत्न करता यावा. या शुध्द हेतुने राष्ट्रिय कुटुंब लाभ योजनेचे निर्माण करण्यात आले आहे. मात्र या योजनेची आमलबजावणी करण्याची जबाबदारी आसलेल्या अधिकाऱ्यांच्या उदासिनतेमुळे देवणी तालुक्यातीत या योजनेचे पात्र लाभार्थी दोन वर्षापासुन या योजनेपासुन वंचित होते,व हेलपाटे मारुन बेजार होते,तर त्यांच्या या योजनेचा लाभ मिळण्यांच्या फाईली धुळ खात पडल्या होत्या.
ही बाब लक्षात घेऊन संघटनेचे प्रवक्ते लक्ष्मण रणदिवे तसेच श्रमीक क्रांती आभियानाचे मराठवाडा प्रमुख डी,एन,कांबळे.लातुर जिल्हा आध्यक्ष गजानंद, गायकवाड,देविदास सुर्यवंशी,यांनी ही योजना लाभार्थीयांना मिळवुन देण्याकरिता संघटनेच्या वतीने निवेदन दिले होते. व याचा पाठपुरावा चालवुन या योजने आंतर्गंत पात्र आसलेल्यांना व दोन वर्षापासुन या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी हेलफाटे मारणाऱ्या एकोणीस पात्र लाभार्थीयांना प्रत्येकी विस हजार रुपयाची मदत मिळवुन देण्यासाठी पोलीस फ्लॅश न्यूजने यासंदर्भात सतत पाठपुरावा आहे. सामान्य जनात पोलीस फ्लॅश न्यूज व श्रमीक क्रांती आभियानाच्या कार्यकर्तेचे तोंड भरुन कौतुक केलं जात आसुन आमचे कोणीतरी वाली या जगात जीवंत आहेत.म्हणुन आम्ही हेलफाटे मारुन आपेक्षा सोडुन बसलेली योजना आमच्या पदरी पडली. आशी प्रतिक्रिया लाभार्थीयांनी दिली आहे,यावेळी त्यांच्या डोळ्यात आश्रु तरळत होते.या विजयामुळे जळकोट तालुक्यातील एकल महिला संघटनेच्या आनिता गायकवाड,मीना वाघमारे,आश्विनी वाघमारे,शारदा मुंगे इत्यादी कार्यकर्त्यांनी विजयी कार्यकर्त्यांचे आभिनंदन करुन शुभेच्छा ही दिल्या आहेत,हे यश मिळविण्यासाठी पोलीस फ्लॅश न्यूज या वृत्तपत्राने संघटनेनी वेळोवेळी प्रशासनास दिलेली निवेदने व प्रतिक्रिया प्रसिध्दीस आणुन प्रशासनास जागे करुन ही योजना मिळवुन देण्याकामी संघटनेस फार मोठी मदत केली आहे.यांनी प्रयत्न केले तर या कामी देवणी तालुक्याचे तहसिलदार गजानंद शिंदे,नायब तहसिलदार माधव साळुंके,संजय गांधी निराधार योजनेचे प्रदिप कांबळे, एल पी उगीले, गणेश होळे संपादक पोलीस फ्लॅश न्यूज,यांनी लाभार्थीयांना योजना मिळवुन देण्याच्या संघटनेच्या कामात मोलांचे सहकार्य केले आसल्याने संघटनेचे प्रमुख देवणी तालुक्यातील १९ लाभार्थ्यांचे एका लाभार्थ्यास २०००० प्रमाणे खात्यावर जमा करण्यात आले आहे. काही प्रस्ताव मंजूरीसाठी पाठवायचे आहेत असे प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले. श्रमिक क्रांती संघटनेचे मारुती गुंडीले यांनी या सर्वांचे आभार व्यक्त केले आहेत. तर कार्यकर्त्यांचे आभिनंदन करुन त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस भरभरुन शुभेच्छा ही दिल्या आहेत.