सुजाण नागरिकांनी कर भरणा करून नगरपरिषदेस सहकार्य करावे व शास्ती टाळावी – मुख्याधिकारी सुंदर बोंदर
उदगीर (एल.पी.उगीले) शहरातील विविध विकास कामे होण्याकरिता त्याचबरोबर नागरिकांना मूलभूत सेवा, सुविधा देण्याकरिता नगरपरिषद कार्यालय सदैव तत्पर असते. परंतु या सर्व कामकाजासाठी निधी देखील तेवढाच आवश्यक आहे, जर नागरिकांनी आपल्याकडील पाणीपट्टी व घरपट्टी, गाळा भाडे वेळेत भरले तर या सर्व कामासाठी नगरपरिषदेस सहकार्य होते. त्यामुळे नागरिकांना उदगीर नगरपरिषदेच्या वतीने मुख्याधिकारी सुंदर बोंदर यांनी जाहीर आवाहन केले आहे की, आपण आपल्याकडील चालू वर्षाची व थकीत मालमत्ता, पाणीपट्टी, गाळा भाडे कर भरून सहकार्य करावे,.
सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात अद्याप पर्यंत मालमत्ता कर ७३ % पाणीपट्टी कर ३९ % या प्रमाणात नागरिकांनी भरणा केलेला आहे. यात पाणीपट्टी कराचे प्रमाण कमी आहे.
महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ मधील १५० अ तरतुदी नुसार दिनांक १ एप्रिल २०२४ नंतर ज्या नागरिकांकडे कराची थकबाकी असेल त्यांना एकूण थकबाकीवर दर महा २% (वार्षिक २४%) शास्ती (दंड) लागणार आहे. तरी नागरिकांनी आपल्या कडील चालू वर्षाची व थकीत मालमत्ता, पाणीपट्टी, गाळा भाडे कर भरणा करून शास्तीची कार्यवाही टाळावी, यांची नोंद सर्व नागरिकांनी घ्यावी असेही आवाहन मुख्याधिकारी सुंदर बोंदर यांनी केले आहे.