लालबहादुर शास्त्री प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांनी दिला पाणी बचतीचा संदेश.
उदगीर: (एल.पी.उगीले) भारतीय शिक्षण प्रसारक संस्था,अंबाजोगाई द्वारा संचलित लालबहादुर शास्त्री प्राथमिक विद्यालय नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवत असते.असाच समाजोपयोगी उपक्रम इयत्ता पहिली वर्गातील विद्यार्थ्यांनी वर्गशिक्षिका श्रीमती सुरेखाबाई कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली राबवला आहे.
सध्या कडक उन्हाळा असल्यामुळे पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे.बऱ्याच ठिकाणी पिण्यासाठीसुद्धा पाणी मिळत नाही.वणवण भटकावे लागत आहे.आहे ते पाणी जपून वापरावे हा संदेश परिसरात देण्याचा प्रयत्न स्वहस्ताक्षरातील “संदेश कार्ड”च्या स्वरूपात चिमुकल्या विद्यार्थ्यांनी केला आहे.या उपक्रमाचे कौतुक भा.शि.प्र.संस्थेचे केंद्रीय सदस्य तथा स्थानिक समन्वय समिती कार्यवाह शंकरराव लासुणे,स्थानिक समन्वय समिती अध्यक्ष मधुकर वट्टमवार,शालेय समिती अध्यक्ष व्यंकटराव गुरमे, मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे,सर्व शिक्षक, कर्मचारी व पालकांनी कौतुक केले आहे.