घरातून ४२ हजार रुपये पळविले, ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल
उदगीर (एल.पी.उगीले) : तालुक्यातील नागलगाव येथील मारोती तांडा येथे घरातून ४२ हजार रुपये अज्ञाताने चोरून नेल्याची घटना घडली आहे,याप्रकरणी २७ मार्च रोजी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मारोती तांडा येथील फिर्यादी बाळू बदू पवार यांच्या राहत्या घरातील पेटीत ठेवलेले ४२ हजार रुपये कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहेत, बाळू बदू पवार रा. मारोती तांडा नागलगाव ता. उदगीर यांच्या फिर्यादी वरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुरंन १७८/२४ कलम ३८० भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास बिट जमादार नामदेव धुळशेट्टे यांच्याकडे देण्यात आला आहे.