हकीम भाई बौडीवले यांची निवड

0
हकीम भाई बौडीवले यांची निवड

देवणी (लक्ष्मण रणदिवे) तालुक्यातील वलांडी येथील हकीम भाई बौडीवाले हे राष्ट्रवादी पक्ष स्थापने पासूनचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. त्यांना पक्षाचे एक निष्ठ कार्यकर्ते म्हणून त्यांची देवणी तालुक्यात ओळख निर्माण केली आहे. त्याचे फळ म्हणून त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वाहतूक सेल जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती मुंबई येथील वाहतूक सेलच्या कार्यालयामध्ये सदरील नियूक्ती पत्र शरदचंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेश अध्यक्ष जयवंतराव पाटील यांच्या सुचनेनुसार वाहतूक संघटना प्रदेश अध्यक्ष मिलिंद अन्ना कांबळे यांनी दिले आहे.
निवडीच्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. जितेंद्र आव्हाड , नरेंद्र पवार व अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष मोहम्मद रफी सय्यद, जेष्ठ कार्यकर्ते अंकुश गायकवाड,आदी उपस्थित होते.
या निवडीचे माजी मंत्री विनायकराव पाटील, जिल्हा अध्यक्ष संजय शेट्टे , जिल्हा कार्याध्यक्ष डॉ बापुसाहेब पाटील,शहर जिल्हा अध्यक्ष राजाभाई मनियार,विनायक अन्ना बगदूरे, इत्यादीने निवडी बद्दल शुभेच्छा दिल्या.
तर देवणी तालुक्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते फकरोद्दीन बूदरे,अमर मूर्के, प्रताप बिरादार,व्यंकट बिरादार,हसन मोमिन, संतोष बिरादार, सोमनाथ रावळे, शिवाजी बिबीनवरे,संदीप पाटील, संतोष बोचरे, नितीन बिरादार, फेरोज शेख, मुस्ताक कादरी,आदीने पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *