मानवि हक्क आभियान या क्रांतीकारी संघटनेच्या जिल्हा सचिव पदी मारुती गुंडीले यांची निवड.
देवणी (लक्ष्मण रणदिवे) भारतीय संविधानाच्या सनदशीर मार्गाने अन्याय , आत्याचाराचा बिमोड करण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या मानवी हक्क आभियान या क्रांतीकारी संघटनेच्या लातुर जिल्हा सचिव पदी उदगीर तालुक्यातील रहिवाशी मारुती गुंडीले यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीचे पत्र मानवी हक्क आभियानाचे मराठवाडा अध्यक्ष मच्छिंद्रभाऊ गवाले यांनी दिले आहे, संघटनेचे प्रदेश अध्यक्ष मिलिंद आव्हाड (नाना)यांनी या निवडी बद्दल आनंद व्यक्त करून करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत,मानवी हक्क आभियानची स्थापना १९९० मध्ये ऍड.एकनाथजी आव्हाड यांनी केली होती,त्यांच्या नेतृत्वाखाली हा लढा तिव्र गतीने चालला आणि अत्याचाराला प्रभावी आळा घालण्यास संघटनेला मोठ्या प्रमाणात यश ही आले,हा लढा तीन पिढ्या चालत आसुन ही संघटना समाजातील दुबळ्या जनास न्याय मिळवुन देणारी प्रभावी संघटना म्हणुन नावारुपास आली आहे,संघटनेचे संस्थापक व तत्कालीन प्रदेश अध्यक्ष प्रभावी नेतृत्व ऍड.एकनाथजी आव्हाड यांच्या अकस्मीत निधनानंतर काही काळ संघटनेचे कार्य थंडावले होते,मात्र त्यांच्या नेतृत्वाच्या जागेवर त्याच तोलामोलाची व्यक्ती दिसुन न आल्याने काही काळ संघटनेने विश्रांति घेतली त्या पुढे त्या रिक्त जागेवर प्रदेश आध्यक्षपदी विचारवंत, जी,एन,यु, कालेज दिल्ली येथे प्रोफेसर आसलेले एकनाथ आव्हाडांचे चिरंजीव प्रा.मिलींद आव्हाड यांचेवर ही जिम्मेदारी देण्याचा ठराव संघटनेने घेऊन महाराष्ट्रातील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रा.मिलिंद आव्हाड यांना संघटनेच्या महाराष्ट्र आध्यक्षपदी सर्वानुमते नियुक्त करुन सदर नेतृत्वाची धुरा सांभाळावी असा आग्रह धरल्याने प्रदेश आध्यक्षपदाची जिम्मेदारी मिलींद आव्हाड यांनी स्विकारली आसुन संघटनेचे कार्य गतीने चालविण्याचा संकल्प सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे,प्रत्येक जिल्हा,तालुका स्थरावर कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या व जबाबदाऱ्या देण्यात येत आहेत,मारुती गुंडीले हे मानवि हक्क आभियानाच्या स्थापनेपासुनचे कार्यकर्ते आसुन,त्यांनी संघटनेचे काम चांगल्या पध्दतीने चालविले होते, मारुती गुंडीले यांच्या निवडीबाबद,आर्जुन जाधव,आनिल जाधव,लक्ष्मण रणदिवे, डि.एन. कांबळे,गजानंन गायकवाड, अड.भाले,मारुती सुर्यवंशी,पाडुरंग चव्हाण,बालाजी गुडसुरे,दिलीप सोनकांबळे,आनिता गायकवाड,मीना वाघमारे,आश्विनी वाघमारे, बालाजी आदावळे,आनिल घोडके,शारदा मुंगे, विनोद घोडके इत्यादींनी मारुती गुंडीले यांचे आभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा ही दिल्या आहेत.