तालुकास्तरीय नृत्य स्पर्धेत सरदार वल्लभ भाई पटेल शाळेतील विद्यार्थ्यानी मारली

0
तालुकास्तरीय नृत्य स्पर्धेत सरदार वल्लभ भाई पटेल शाळेतील विद्यार्थ्यानी मारली

उदगीर (एल.पी.उगीले) येथील सार्वजनिक शिवजन्मोस्तव समितीच्या वतीने आयोजित केलेल्या विविध स्पर्धेत 29 शाळेतून 1120 विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यामध्ये तालुकास्तरीय नृत्य स्पर्धेत सरदार वल्लभभाई पटेल शाळेतील सेमी इंग्रजी माध्यमाच्या इयत्ता चौथीतील रायगड कक्षातील विद्यार्थ्याचा नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक तर गोंधळ नृत्य मुलीं मधून प्रथम क्रमांक असे नृत्याच्या दोन्ही गटातून प्रथम क्रमांक आलेले आहेत. प्रत्येकी एका गाण्यासाठी 1050,+1050 असे तब्बल 2100 रुपयाचे बक्षीस प्रतिवर्षां प्रमाणे याही वर्षी इयत्ता चौथी रायगड कक्षातील विद्यार्थ्यांनी पटकावले आहेत. रक्तचरित्र नृत्यातील सहभागी विद्यार्थी प्रशिक सोनकांबळे, श्रेयस स्वामी, अंश ऐनिले, कैवल्य शिंदे, सार्थक दरबस्तवार,मोनिका शेटकार, गोंधळ नृत्यातील सहभागी विद्यार्थिनी स्वराली हंसनाळे, सायली सूर्यकर,
आस्था पोलावार,दीक्षा चौधरी,श्रुती शेटकार सृष्टी पाटील, तनवी तोंडारे यांचा समावेश होता. प्रथम आलेल्या विद्यार्थ्यासह नृत्यातील इतर सहभागी विद्यार्थ्यांना बक्षीस वितरणासाठी प्रमुख पाहुणे उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे, गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर, ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरविंद पवार, सरदार वल्लभभाई पटेल विद्यालयाचे शालेय समिती अध्यक्ष उमाकांतजी बुधे, सरदार वल्लभभाई पटेल सेमी इंग्रजी विभाग प्रमुख आशा बेंजरगे, कुणाल बागबंदे, जयवंतराव पाटील, सतीश पाटील मानकीकर, प्रा.राहुल आतनुरे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना रोख रक्कम आणि सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र देऊन बक्षीस वितरण सोहळ्यात विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. यावेळी उपक्रमशील शिक्षिका सौ. मंगल वाडकर यांच्या सर्वांनी कौतुक केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *