डॉ. तेलगाने यांचा आदर्श इतरांनी घ्यावा – देविदास गायकवाड

0
डॉ. तेलगाने यांचा आदर्श इतरांनी घ्यावा - देविदास गायकवाड

उदगीर (एल. पी. उगिले) येथील ओम मॅटरनिटी होम अँड हॉस्पिटल चे डॉ शरदकुमार तेलगाने यांनी स्वखर्चातून राष्ट्रसंत गाडगेबाबा चौक उदगीर येथे वर्षाप्रमाणे पाणपोई सुरू केली आहे. या पाणपोईचे उद्घाटन के.टी. तेलगाने यांच्या हस्ते करण्यात आले, तर देविदास गायकवाड आणि गोविंद भंडे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना देविदास गायकवाड यांनी सांगितले की, मोंढा परिसरात शेतमाल विक्रीसाठी ग्रामीण भागातून शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, व्यापारी मोठ्या प्रमाणात येतात. सध्या शहरात पाणी टंचाई जाणवू लागली आहे. ग्रामीण भागातील माणसाला हॉटेलमध्ये पाणी मोफत मिळत नाही. चहा किंवा नाश्ता केला तरच पाणी मिळते. अशी परिस्थिती आहे. शिवाय अशुद्ध पाण्यामुळे रोगराई पसरू शकते, त्याचे गांभीर्य विचारात घेऊन प्रत्येक वर्षी डॉ. शरदकुमार तेलगाने नवामोंढा येथे राष्ट्रसंत गाडगेबाबा चौकात पाणपोई सुरू करतात. तशी यावर्षीही त्यांनी सुरू केली आहे. कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करत असताना उन्हाळ्यात पशुपक्षांना पाणी पिण्यासाठी पानवटे तयार करा, असे ते अनेकदा सांगतात. यावर्षीही तशा पद्धतीच्या अनेक पाट्यांचे फलक त्यांनी ग्रामीण भागात लावले आहेत. शहरी भागातही पाण्याची गरज लोकांना जाणवू शकते, हे ओळखून त्यांनी पानपोई सुरू केली आहे. नवा मोंढा हा सतत गजबजलेला भाग असतो. या भागात ग्रामीण शेतकरी मोठ्या प्रमाणात येतात त्यांची सोय करण्यासाठी डॉ. शरदकुमार तेलगाणे यांनी ही सुविधा सुरू केली आहे. ते सतत सांगतात की, समाजकार्याची सुरुवात स्वतःपासून झाली पाहिजे. या भावनेतून त्यांनी या पाणपोई ची सुरुवात करण्याच्या सूचना केल्याचेही याप्रसंगी देविदास गायकवाड यांनी सांगितले. तसेच समाजसेवेसाठी डॉ. शरद कुमार तेलगाणे यांचा आदर्श इतरांनी घ्यावा. असेही आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी गोविंद भंडे यांनीही आपले विचार मांडले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *