गाथा पारायणात विळेगाव येथे केली मतदान जनजागृती

0
गाथा पारायणात विळेगाव येथे केली मतदान जनजागृती

अहमदपूर (प्रतिनिधी)

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी लातूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने “उत्सव निवडणूकीचा अभिमान देशाचा” या ब्रिद खाली वेगवेगळ्या उपक्रमातून सामान्य जनतेपर्यंत जनजागृती करण्याचे कार्य सुरु आहे.अहमदपूर-चाकूर विधानसभा मतदार संघात लोकसभेसाठी स्वीप कला पथकाव्दारे नाविन्यपूर्ण उपक्रमातून जनजागृती होत असून दि.१९ रोजी सकाळी विळेगाव येथे ज्ञानेश्वरी पारायणात गावकरी बांधव व गाथा पठन करणारे भक्त गणांना मतदानाविषयीचे महत्त्व पटवून देऊन महादेव खळुरे यांनी जनजागृती केली.
सर्वसामान्यांसाठी असणारा गीतेवरील ज्ञानेश्वरांचा हा मराठीतील सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे. सबंध विश्वाचे माझे घर,कर्माचे महत्व सांगणारा अखंड सागर,आत्म्याची संकल्पना,सदविवेक बुद्धी,पुरुषांचे चांगले लक्षणे,मन शांती व चंचलता याचे विवरण,मोह माया,प्रकृती,ज्ञान असे असंख्य गोष्टी जे जीवन जगत असताना सजीव सृष्टीला दिशा देण्यासाठी बाराव्या शतकात प्रवरातीरी असणाऱ्या नेवासे या गावातील मंदिरात एक खांबाला टेकून भगवद्गीतेवर ज्ञानेश्वरांनी जे भाष्य केले त्यालाच ज्ञानेश्वरी किंवा भावार्थदीपिका म्हटले जाते.
लोकांनी, लोकांच्या हिताकरिता, लोकांकरवी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही.लोकशाहीची ताकद प्रत्येक खांबाच्या ताकदीवर आणि खांब एकमेकांना कसे पूरक आहेत यावर अवलंबून असते.लोकशाहीतील एक महत्वाचा घटक म्हणून निवडणूकीकडे पाहिले जाते.लातूर लोकसभा निवडणूकीसाठी ७ मे रोजी मतदान होणार असून यासाठी विळेगावातील मतदार बांधवांनी १००% मतदान करावे यासाठी ज्ञानेश्वरी पारायण चालू असताना स्वीप पथकाने मतदार जनजागृती केली.
या अभियानांसाठी जिल्हाधिकारी वर्षा घुगे-ठाकुर मॅडम सहाय्यक निवडणूक अधिकारी मंजुषा लटपटे,अहमदपूर चे तहसीलदार शिवाजी पालेपाड,चाकूर चे तहसीलदार नरसिंग जाधव, गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघात जनजागृती कार्यक्रम करण्यात येत असून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वीपचे पथक प्रमुख महादेव खळुरे,मोहन तेलंगे,नागनाथ स्वामी,श्रीमती अर्चना माने,आदिनी परिश्रम घेतले.
विळेगावचे गोपाळ महाराज ढाळेगावकर,ग्रामसेवक विठ्ठल तेलंगे,पोलिस पाटील विजयकूमार घाळगीर,कोडिंबा चिंचोळकर,रुकमाजी देवकत्ते,मनोज घाळगीर,बळीराम देवकत्ते,विजयकुमार घारे,
कदम ए.एन.,दर्शने बी.एम.आदिंची उपस्थिती होती.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *