एन.एम.एम.एस. परीक्षेत लालबहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालयाचे उत्तुंग यश
उदगीर (एल.पी.उगीले) लाल बहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांसाठी घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत उत्तुंग यश मिळविले आहे.या परीक्षेचा अंतिम निकाल जाहिर झाला असून या परीक्षेसाठी विद्यालयातील एकुण 85 विद्यार्थ्यांनी आवेदन पत्र भरले होते.त्यापैकी 47 विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले. त्यापैकी 4 विद्यार्थी शिष्यवृत्त्ती साठी पात्र ठरले आहेत.यामध्ये कु.श्वेता शिवाजी बिरादार 141, कु. आर्या राजेश वासुदेवणे 117, कु. गायत्री धनंजय भोसले 115, चि.पियूष सतीश लाडवते 109, हे विद्यार्थी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पात्र झाले आहेत. या यशस्वी विद्यार्थ्यांना एन एम एम एस परीक्षा प्रमुख दिलीप पाटील व राहुल नेटके यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डाॅ.सुरेंद्र आलुरकर, कार्यवाह डाॅ.हेमंतजी वैद्य, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य तथा लालबहादूर शास्त्री शिक्षण संकुलाचे कार्यवाह शंकरराव लासुणे, अध्यक्ष मधुकरराव वटमवार,शालेय समिती अध्यक्ष सतनाप्पा हुरदळे, मुख्याध्यापक अंबादास गायकवाड ,उपमुख्याध्यापक संजय कुलकर्णी, पर्यवेक्षक कृष्णा मारावार, श्रीपत सन्मुखे, माधव मठवाले तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले.