निवडणूक निरीक्षक बॅनर्जी यांची उदगीर येथे भेट
उदगीर (एल.पी.उगीले): लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी नियुक्त निवडणूक निरीक्षक (खर्च) संजीव बॅनर्जी यांनी उदगीर विधानसभा मतदारसंघास भेट देऊन लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी पंचायत समिती उदगीर येथे स्थापन करण्यात आलेल्या कक्षास भेट देऊन, सुचना व मार्गदर्शन केले. तसेच तहसील कार्यालय उदगीर येथील सभागृहात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी नियुक्त करण्यात आलेल्या विविध पथकाची बैठक घेऊन सुचना व मार्गदर्शन केले. सदर बैठकीमध्ये निवडणूक निरीक्षक यांनी लेखा पथकास दैनंदिन हिशोब अद्यावत ठेवण्याच्या सुचना दिल्या. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त होणा-या सुचनेप्रमाणे सर्व पथकप्रमुख यांनी समन्वय ठेवून सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कामकाज करण्याच्या सुचना दिल्या. सी.व्ही. बील अॅपवर प्राप्त होणा-या तक्रारीचा निपटारा विहित वेळेत करण्याबाबत मार्गदर्शन केले, तसेच विविध राजकीय पक्षांनी सादर केलेला खर्च व कार्यालयातील पथकाकडून आलेल्या खर्चाबाबतच्या माहितीची पथकानी तपासणी करुन, अचूकतेबाबत खात्री करावी. व फरक आढळून आल्यास नियमानुसार कार्यवाही करणे बाबतचा प्रस्ताव सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे सादर करणे बाबत कळविण्यात आले. स्टार प्रचारकाचा बाबत विहित केलेल्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे कार्यवाही करणे, एस.एस.टी, एफएसटी,हीएसटी, व्हीव्हीटी पथकांनी दक्ष राहून आपापले काम पूर्ण करणे बाबत तसेच वाहनांची तपासणी करणे, मद्य, रोकड जप्त करण्याची कार्यवाही मार्गदर्शक सूचनेप्रमाणे करणे बाबतचे मार्गदर्शन केले.
प्रारंभी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुशांत शिंदे यांनी 237 उदगीर विधानसभा मतदारसंघातील स्थापन करण्यात आलेल्या पथकांची, मतदान केंद्राची, तसेच इतर माहिती पीपीटीद्वारे निवडणूक निरीक्षक यांना दिली. बैठकीत निवडणूक निरीक्षक यांचे स्वागत करण्यात आले. बैठकीला उपविभागीय अधिकारी तथा सहा. निवडणूक निर्णय अधिकारी सुशांत शिंदे, अतिरीक्त मुख्यकार्यकारी अधिकारी तडबी , तहसीलदार उदगीर राम बोरगावकर, तहसीलदार जळकोट सुरेखा स्वामी, गटविकास अधिकारी उदगीर प्रविण सुरडकर, गटविकास अधिकारी संतोष माने, सहाय्यक गटविकास अधिकारी सचिन पाटील, नायब तहसीलदार संतोष गुट्टे आदीसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. निवडणूक निरीक्षक यांनी उदगीर येथील तोगरी मोड एस. एस.टी. पथकास भेट देवून तपासणी व मार्गदर्शन केले.
