माणुसकीचा धर्म राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराजांनी शिकविला-शि.भ.प. कु. ज्योती टाकळे

0
माणुसकीचा धर्म राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराजांनी शिकविला-शि.भ.प. कु. ज्योती टाकळे

उदगीर (एल.पी.उगीले)माणुसकीचा धर्म राष्ट्र संत डाॅ.शिवलिंग शिवाचार्य महाराजांनी शिकविला, प्राणीमात्राबर प्रेम करतो, तो माणुसकीचा धर्म पाळतो. तोच खरा धर्म असुन किर्तनाच्या माध्यमातून माणुसकीचा धर्म टिकवायचा, जोपासायचा व राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे पुढे चालवायचा आहे.
असे विचार बाल किर्तनकार शि.भ.प. कु. ज्योती टाकळे यांनी व्यक्त केले.त्या ओंकारेश्वर महादेव मंदिर एस. टी. कॉलनी नळेगाव रोड नविन वसाहत मलकापुर येथे ओंकारेश्वर महिला भजनी मंडळाच्या वतीने प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी परमरहस्य ग्रंथाच्या पारायणात किर्तन करताना व्यक्त केले. याप्रसंगी महिला शिवभक्तांची संख्या लक्षणीय आहे. रामनवमी निमित्त बालकिर्तनकार शि.भ.प.कु. ज्योती टाकळे यांचे”कलयुगामध्ये भजन” हे सार या अभंगावर किर्तनरुपी सेवा केली. कलयुगामध्ये भजन व संकिर्तनाचे महत्व आपल्या ओजस्वी वाणीतुन वेगवेगळे दृष्टांत देवून सादर केले. किर्तनासाठी सिध्दरामेश्वर महिला भजनी मंडळाने तर गणेश उमाटे या बालकिर्तनकाराने संगीताची साथ दिली. सकाळी १० वाजता परमरहस्य ग्रंथाची मिरवण क राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज चौक उड्‌डानपुला जवळ येथुन ओंकारेश्वर महादेव मंदिरापर्यंत निघाणार आहे. मिरणुकीनंतर श्री गुरु हावगीस्वामी मठाचे मठाधिश डॉ. शंभुलिंग शिवाचार्य महाराज यांच्या उपस्थितीत व आशीर्वाचनाने सांगता होणार आहे. पारायण यशस्वीतेसाठी ओंकारेश्वर भजनी महिला मंडळाचे सौ. वनमाला अशोक कप्ते, श्रीमती जयदेवी पोस्ते, सरुताई हलबर्गे, सुनिता कड्डे, मीना हलकुडे, छाया स्वामी, पार्वती स्वामी, सुशिला स्वामी, जगदेवी स्वामी, इंदुबाई कमठाणे, मंजु कमे, शालु सोनटक्के यांच्यासह महिला शिवभक्त परिश्रम घेत आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *