भाजपच्या जिल्हा सरचिटणीसपदी ॲड भाऊसाहेब जांभळे यांची निवड

0
भाजपच्या जिल्हा सरचिटणीसपदी ॲड भाऊसाहेब जांभळे यांची निवड

उदगीर (एल.पी.उगीले) उदगीर तालुक्यातील वायगाव येथील
भाजपचे कार्यकर्ते ॲड. भाऊसाहेब तुळशीदास जांभळे यांची भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा सरचिटणीस पदी भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख (मालक) यांनी निवड केली आहे.
सदरील निवडीचे पत्र भाजपचे नेते व उदगीरचे माजी. आ . सुधाकर भालेराव यांच्या हस्ते देण्यात आले. ही निवड माजी. आ सुधाकर भालेराव यांच्या शिफारशीवरून जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख यांनी केली आहे. यावेळी भाजपा अनुसुचित जाती मोर्चाचे प्रदेश सचिव ॲड . शाम कांबळे, संग्राम भालेराव इत्यादी उपस्थित होते.
यापुर्वी विधिज्ञ जाभंळे यांनी भाजयुमो उदगीर तालुका उपाध्यक्ष, भारतीय जनता पक्षाचे विधी आघाडी चे तालुका अध्यक्ष म्हणून उत्तम काम केले. या कामाची दखल घेऊन त्यांची निवड करण्यात आली आहे.
या निवडीबाबत माजी आ. गोविंद केंद्रे, जि . प. माजी उपाध्यक्ष रामभाऊ तिरुके . उदगीर तालुका अध्यक्ष शिवशंकर धुप्पे ,न.प.चे माजी उपाध्यक्ष
सुधीर भोसले , भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष मनोज पुदाले,भाजप माजी तालुकाध्यक्ष बसवराज रोडगे , संजय पाटील, सुजीत जिवणे, गिरीश पाटील, आनंद बुदे , उदयसिंह ठाकूर, बालाजी गवारे, गणेश गायकवाड, ॲड. श्रवणकुमार माने इत्यादीनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत .

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *