ग्राहक सेवा संस्था जिल्हा अध्यक्षपदी नितीन देशमुख

0
ग्राहक सेवा संस्था जिल्हा अध्यक्षपदी नितीन देशमुख

देवणी (लक्ष्मण रणदिवे)
ग्राहक सेवा संस्था महाराष्ट्र या संस्थेच्या लातूर जिल्हा अध्यक्षपदी नितीन देशमुख यांची एक मताने निवड संस्थापक अध्यक्षा व अशासकीय सदस्य पुरवठा विभाग जिल्हा अधिकारी कार्यालय लातूर सौ रंजना मालूसरे पाटील यांनी करून नियुक्तीपत्र दिले.
लातूर जिल्ह्यातील ग्राहक यांची होणारी फसवणूक थांबवावी, ग्राहकांची आर्थिक पिळवणुक थाबवावी, वस्तू किमती पेक्षा जास्त दराने विक्री करणाऱ्यांवर कारवाई करून मुळ किंमतीतच विक्री होण्याची गरज आहे. ग्राहकांची फसवणूक करुन बनावट वस्तू विक्री करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करून ग्राहकांना न्याय मिळवून द्यावे.ग्राहक संरक्षण कायद्यानुसार प्रत्येक भारतीय ग्राहकाला सहा हक्क मिळाले आहेत. 1) सुरक्षेचा हक्क. 2) माहितीचा हक्क. 3) निवड करण्याचा अधिकार. 4) म्हणणे मांडण्याचा हक्क. 5) तक्रार करण्याचा आणि निवारण करून घेण्याचा हक्क. 6) ग्राहक हक्कांच्या शिक्षणाचा अधिकार ग्राहकांना देण्यात आलेल्या अधिकारांचे आणि हक्कांचे संरक्षण व्हावे, म्हणून केंद्र सरकारकडून हेल्पलाईन चालविण्यात येते. केंद्र सरकारकडून चालविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईनच्या 1800114000 या टोल फ्री क्रमांकावर तक्रारी करण्यात येतात. तसेच,तक्रारी नोंद करून फसवणूक थांबवावेत. असे आदेशित करून ग्राहक सेवा संस्था महाराष्ट्र या संस्थेच्या जिल्हाध्यक्ष पदी नितीन देशमुख यांची निवड संस्थापक अध्यक्षा व अशासकीय सदस्य पुरवठा विभाग जिल्हा अधिकारी कार्यालय लातूर सौ. रंजना मालूसरे पाटील यांनी केली. या प्रसंगी योगेश पाटील, अभंग सूर्यवंशी संघटक रास्त दुकानदार संघटना देवणी, वसंत बिबीनवरे संस्थापक अध्यक्ष उपेक्षित लोक कलावंत सामाजिक संघटना, माधव सपकाळे सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed